टोल फ्री नंबर : सहा प्राधिकृत अधिकारी नियुक्त होर्डिंग्जविरोधात मनपा सरसावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 12:58 AM2018-01-01T00:58:27+5:302018-01-01T00:58:58+5:30

नाशिक : शहरात कुठेही बेकादेशीरपणे होर्डिंग्ज उभारत त्या माध्यमातून चमकोगिरी करणाºयांवर आता कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.

Toll Free Number: Nominated Sarsawali against Hurdings appointed six authorized officers | टोल फ्री नंबर : सहा प्राधिकृत अधिकारी नियुक्त होर्डिंग्जविरोधात मनपा सरसावली

टोल फ्री नंबर : सहा प्राधिकृत अधिकारी नियुक्त होर्डिंग्जविरोधात मनपा सरसावली

Next
ठळक मुद्देनियमांचे सर्रासपणे उल्लंघनचोवीस तासांत त्यांसदर्भात दखल

नाशिक : शहरात कुठेही बेकादेशीरपणे होर्डिंग्ज उभारत त्या माध्यमातून चमकोगिरी करणाºयांवर आता कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. सार्वजनिक ठिकाणी अनधिकृतपणे होर्डिंग्ज व बॅनरबाजी रोखण्यासाठी महापालिकेने सहा विभागांत सहा प्राधिकृत अधिकाºयांची नियुक्ती केली असून, त्यांच्याकडे तक्र ारी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय थेट तक्रारींसाठी हेल्पलाइन व टोल फ्री क्रमांकदेखील सुरू केले आहेत. सदर क्रमांकांवर कॉल केल्यानंतर चोवीस तासात होर्डिंग्ज हटविण्याचा दावा महापालिकेने केला आहे.
शहराच्या सौंदर्यीकरणाला बाधा आणणाºया होर्डिंग्जबहाद्दरांविरुद्ध न्यायालयाने वारंवार सरकारला कारवाईचे आदेशित केलेले आहे. परंतु, न्यायालयाचे आदेश असतानाही खुलेआम नियमांचे उल्लंघन करत शहराच्या विद्रुपीकरणात भर घातली जात आहे. विशेष म्हणजे, राजकीय पदाधिकारी, लोकप्रतिनिधींकडूनच नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होताना दिसून येत आहे. एकीकडे शहराला स्मार्ट सिटी बनविण्याचा ध्यास घेतला जात असताना काही मूठभरांमुळे शहराचा नावलौकिक धुळीस मिळत आहे. महापालिकेकडून होर्डिंग्ज हटविण्याची कार्यवाही केली जाते. परंतु, संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया राबविली जात नसल्याने होर्डिंग्ज बहाद्दरांचे फावते आहे. आता उच्च न्यायालयाने आणखी यासंबंधी कठोरपणे कारवाईचे आदेशित केल्यानंतर महापालिकेनेअनिधकृत होर्डिंग्डवर कारवाईसाठी सहा विभागांत सहा प्राधिकृत अधिकाºयांची नियुक्ती केली आहे. सदर अधिकाºयांकडे अनिधकृत होर्डिंग्जसदर्भात तक्र ारी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तक्र ार केल्यानंतर चोवीस तासांत त्यांसदर्भात दखल घेतली जाणार असल्याचे अतिक्र मण विभागाने म्हटले आहे.
टोल फ्री व हेल्पलाइन नंबर
सहा विभागांत सहा प्राधिकृत अधिकाºयांची नियुक्त करण्यात आली असून, त्यांना कारवाईचे अधिकार देण्यात आले आहेत. याशिवाय, हेल्पलाइन व टोलफ्री क्रमांकाची सेवा सुरू करण्यात आली आहे. एसएमएस व थेट संपर्कासाठी ९४२३१७००९७ हा क्रमांक असून, १८००२३३१९८२ आणि १८००२३३४७१ हा टोल फ्री नंबर जाहीर केला आहे. या क्रमांकावर संपर्क केल्यानंतर २४ तासाच्या आत कारवाई करण्यात येणार आहे. संबंधित तक्र ारदाराचे नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे.

Web Title: Toll Free Number: Nominated Sarsawali against Hurdings appointed six authorized officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.