नाशकातही आजपासून टोलमध्ये वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:16 AM2021-04-01T04:16:01+5:302021-04-01T04:16:01+5:30
नाशिक : नाशिकमधून बाहेर जाणाऱ्या आणि नाशिकला येणाऱ्या चारचाकी वाहनचालकांचा प्रवास १ एप्रिलपासून महागणार आहे. त्यात नाशिक ते पिंपळगाव ...
नाशिक : नाशिकमधून बाहेर जाणाऱ्या आणि नाशिकला येणाऱ्या चारचाकी वाहनचालकांचा प्रवास १ एप्रिलपासून महागणार आहे. त्यात नाशिक ते पिंपळगाव बसवंतदरम्यानचा एकेरी टोल १५० रुपये, नोंदणीकृत वाहनांसाठी ७५ रुपये टोल आकारला जाणार आहे.
नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात न्हाई या संस्थेने राष्ट्रीय महामार्गावरील टोल दरात १ एप्रिलपासून ५ टक्क्यांची वाढ घोषित केली होती. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रत्येक आर्थिक वर्षात टोल टॅक्स वाढवते. फास्टटॅगच्या टोल टॅक्समध्ये वाढ केल्याने सर्वसामान्यांपासून ते ट्रान्सपोर्टर्सपर्यंत सर्वांना त्याचा फटका बसणार आहे. टोल वाढविण्यात आल्याने वाहतूकदार तसेच सामान्य चारचाकीधारकांवरही त्याचा बोजा पडणार आहे. जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत टोल प्लाझा येथे कार, जीप, व्हॅन, एलएमव्हीसाठी दोनपेक्षा अधिक खेपांसाठी २२५ रुपये राहणार आहे. तर त्यावरील अवजड वाहनांसाठीदेखील त्याचप्रमाणात टाेलवाढ करण्यात आली आहे. दरम्यान टोल नाक्याच्या २० किलोमीटर पर्यंतच्या परिसरात राहणाऱ्या अव्यावसायिक स्थानिकांच्या वाहनांसाठी २०२१-२२ या वर्षासाठी मासिक पासचे दर २८५ रुपये करण्यात आले आहेत.