पोलीस यंत्रणेकडून होतेय टोलवाटोलवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 01:32 AM2019-01-08T01:32:34+5:302019-01-08T01:32:52+5:30
जादा व्याजाचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांना तक्रार नक्की करायची कोठे? असा प्रश्न पडला आहे़ गंगापूर पोलीस ठाण्यात गेल्यास ते आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेत पाठवितात तर आर्थिक गुन्हे शाखा गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यास सांगतेय़ पोलिसांकडून होत असलेल्या टोलवाटोलवीमुळे अखेरचा पर्याय म्हणून मंगळवारी (दि़८) गुंतवणूकदार गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रारीसाठी जाणार आहेत़
नाशिक : जादा व्याजाचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांना तक्रार नक्की करायची कोठे? असा प्रश्न पडला आहे़ गंगापूर पोलीस ठाण्यात गेल्यास ते आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेत पाठवितात तर आर्थिक गुन्हे शाखा गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यास सांगतेय़ पोलिसांकडून होत असलेल्या टोलवाटोलवीमुळे अखेरचा पर्याय म्हणून मंगळवारी (दि़८) गुंतवणूकदार गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रारीसाठी जाणार आहेत़
गंगापूर रोडवरील दत्त चौकात कार्यालय असलेल्या कंपनीने हजारो गुंतवणूकदारांना जादा व्याजाचे आमिष दाखवून सुमारे पंधरा कोटी रुपयांना गंडविल्याचे समोर आले आहे़ सर्वप्रथम गुंतवणूकदार गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रारीसाठी गेले असता कोट्यवधी रुपयांची फसवणूक असल्याने त्यांना पोलीस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेत जाण्याचा सल्ला देण्यात आला़ त्यानुसार सोमवारी (दि़७) बहुतांशी गुंतवणूकदार तक्रारीसाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे गेले असता त्यांना पुन्हा गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा सल्ला देण्यात आला आहे़
जादा परतावा देण्याचे आमिष कंपनीचे संचालक दाखवित होते़ काही दिवसांपासून संचालकांकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसून त्यांनी कंपनी बंद केल्याचे गुंतवणूकदारांचे म्हणणे आहे़ त्यातच पोलिसांकडूनही टोलवाटोलवी केली जात असल्याने गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत़