सिन्नर बाजार समितीच्या पांढुर्ली उपबाजारात आजपासून टोमॅटो लिलाव सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 02:36 PM2020-09-30T14:36:58+5:302020-09-30T14:37:08+5:30

सिन्नर : सिन्नर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या पांढुर्ली (सावतामाळीनगर) उपबाजार आवारात आज गुरुवारपासून (दि. 1) दुपारी 3 वाजता टोमॅटो खरेदी विक्रीचा शुभारंभ आमदार माणिकराव कोकाटे यांचे हस्ते व जि.प.सदस्या सिमंतीनी कोकाटे, बाजार समितीचे सभापती विनायकराव तांबे, उपसभापती सुधाकरराव शिंदे यांच्यासह बाजार समितीचे पदाधिकारी, अधिकारी, व्यापारी यांच्या उपस्थितीत करण्यात येणार असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव विजय विखे यांनी दिली.

Tomato auction starts from today in Pandhurli sub-market of Sinnar market committee | सिन्नर बाजार समितीच्या पांढुर्ली उपबाजारात आजपासून टोमॅटो लिलाव सुरु

सिन्नर बाजार समितीच्या पांढुर्ली उपबाजारात आजपासून टोमॅटो लिलाव सुरु

Next
ठळक मुद्देशेतकरी वर्गाने पांढुर्ली या बाजारपेठेस प्राधान्य

सिन्नर : सिन्नर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या पांढुर्ली (सावतामाळीनगर) उपबाजार आवारात आज गुरुवारपासून (दि. 1) दुपारी 3 वाजता टोमॅटो खरेदी विक्रीचा शुभारंभ आमदार माणिकराव कोकाटे यांचे हस्ते व जि.प.सदस्या सिमंतीनी कोकाटे, बाजार समितीचे सभापती विनायकराव तांबे, उपसभापती सुधाकरराव शिंदे यांच्यासह बाजार समितीचे पदाधिकारी, अधिकारी, व्यापारी यांच्या उपस्थितीत करण्यात येणार असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव विजय विखे यांनी दिली.
यापुर्वी पंचक्रोशितील शेतकर्‍यांना टोमॅटो विक्रीसाठी समशेरपुर, नाशिक, पिंपळगाव येथे जावे लागत होते, तथापि सिन्नर बाजार समितीने पांढुर्ली उपबाजार येथे टोमॅटो खरेदीविक्रीचा शुभारंभ केल्याने शेतकरी वर्गाने पांढुर्ली या बाजारपेठेस प्राधान्य दिले असून ते याही वर्षी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. सदर बाजार आवार शेतकर्‍यांसाठी आठवड्यातील संपुर्ण सात दिवस सुरु राहील. समितीमार्फत शेतकरी व्यापारी घटकांस सर्व प्रार्थमिक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
पांढुर्ली उपबाजार आवारात टोमॅटो खरेदीसाठी आर. के. बागवान, लक्ष्मी ट्रेडींग कपनी, प्रभाकरशेठ हारक, निवृत्तीशेठ चव्हाणके, बाळासाहेब दळवी, रईसशेठ पटेल, एफ. एम. ट्रेडर्स, शालीमार ट्रेडर्स, एस. एस. बागवान, श्री गणेश ट्रेडींग कंपनी, जोशी ट्रेडर्स, के. एस. बी. कंपनी, नाना खरात, फिरोज शेख, मे. एन. जी. एस. कंपनी, जब्बारभाई शेख, बापुशेठ डांगे, आल्मभाई शेख दिल्ली एक्सपोर्ट, शाकीर युसुब शेख,अन्सारभाई शेख, मे.एन.बी.एस.कंपनी, आतीफभाई शेख, मे. बी. आर. टी. कंपनी, प्रमोदशेठ यादव, अनिलशेठ हारक, साईबाबा व्हीजीटेबल कं. हरीयाणा, न्यु मिलन व्हीजीटेबल कंपनी येवलावाले, यासह मोठ्या संख्येने टोमॅटो खरेदीदार व्यापारी लिलावात सहभागी होवून टोमॅटो शेतमाल खरेदी करणार आहेत. तरी शेतकरी बांधवांनी आपला टोमॅटो शेतमाल पांढुर्ली उपबाजार आवारात प्रतवारी करुन विक्रीसाठी आणावा तसेच बाजार आवारात येतांना नाका-तोंडाला मस्क किंवा रुमालचा वापर करावा व सोशल डिस्टंगसींग ठेवून दोन व्यक्तींमध्ये किमान 2 मिटर अंतर ठेवावे. असे अवाहन बाजार समितीचे प्रशासनाने केले आहे.

Web Title: Tomato auction starts from today in Pandhurli sub-market of Sinnar market committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.