टमाट्याची लाली उतरली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 02:33 PM2019-12-11T14:33:42+5:302019-12-11T14:33:52+5:30

वणी : राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश या राज्यात मोठ्या प्रमाणावर उत्पादन व स्थानिक उत्पादनास अपेक्षित मागणी नसल्याने टमाटा दरात घसरण झाल्याने उत्पादक हवालिदल झाले आहेत.

 Tomato blush has gone down! | टमाट्याची लाली उतरली !

टमाट्याची लाली उतरली !

googlenewsNext
ठळक मुद्देउत्पादक चिंतीत : वणी उपबाजार आवारात दरात घसरण

वणी :  मोठ्या प्रमाणावर उत्पादन व स्थानिक उत्पादनास अपेक्षित मागणी नसल्याने टमाटा दरात घसरण झाल्याने उत्पादक हवालिदल झाले आहेत. टमाट्याची २० किलोची जाळी ४० ते १२० रूपये पर्यंत विकली जात आहे. दिंडोरी तालुक्यात टमाटा पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली आहे. नगदी पिक व वेळेवर चार पैसे मिळवुन देणारे पिक म्हणुन टमाटा परिचीत आहे. टमाट्याला हमखास भाव मिळतो असे उत्पादकांचे नियोजन प्रतिवर्षीचे असते. टमाट्याला अपेक्षित मागणी नाही. वणी उपबाजार व खोरीफाटा परिसरात सुमारे ४० हजार जाळीची आवक सध्य:स्थितीत असुन परराज्यात टमाटा विक्र ीसाठी जात आहे. मात्र समाधानकारक दर उत्पादकांना मिळत नाही. कारण सध्या गुजरात राज्यातील स्थानिक ठिकाणच्या उत्पादन केन्द्रात मोठ्या प्रमाणावर टमाटा उत्पादित होतो आहे. आकारमान व चवीच्या तुलनेत तो टमाटा उजवा ठरतो स्थानिक ठिकाणी मागणी पूर्ण करून तो टमाटा इतर परराज्यात मागणीप्रमाणे पुरविण्यात येत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

Web Title:  Tomato blush has gone down!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक