टमाटा, वांगी ३० तर गवार ८० रु किलो, कोथंबिर ६० रु. जुडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:14 AM2021-05-16T04:14:14+5:302021-05-16T04:14:14+5:30
चौकट- शेतकरी गटांची बहुसंख्य दुकाने बंद शहरात अनेक शेतकरी गटांनी भाजीपाला विक्रीची दुकाने सुरू केली आहे. शेतकरी ते ग्राहक ...
चौकट-
शेतकरी गटांची बहुसंख्य दुकाने बंद
शहरात अनेक शेतकरी गटांनी भाजीपाला विक्रीची दुकाने सुरू केली आहे. शेतकरी ते ग्राहक थेट साखळी असली तरी सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंतची वेळ भाजीपाल्यासाठी योग्य ठरत नाही. दुकान लावले की, लगेचच बंद करण्याची वेळ होते. पोलीसही त्रास देत असतात, शिवाय जिल्हा प्रशासनाच्या वेगवेगळ्या नियमांची पूर्तता करणे शक्य होत नसल्याने अनेक गटांनी आपली भाजीपाला विक्री केंद्र बंद ठेवली आहेत.
चौकट-
शहरातील भाज्यांचे दर (किलो, रु.)
टमाटा - ३० ,गवार - ८० , काकडी - ३० , दोडका -८०, फ्लॉवर -१५ रु. नग, कोबी - १० रु. नग , कांदा -३० , भेंडी -४० , वांगी - ३० , मिरची -६० , कारले -४० , गिलके ४० , बटाटा -३० ते ४० ,
भोपळा -२० (नग), पालक - २० रु. जुडी, मेथी २० रु. जुडी, कोथिंबीर ६० रु. जुडी
कोट -
कोरोनाची रुग्णसंख्या वाढल्याने आमच्या गावातील सर्व शेतकरी बचत गटाच्या सदस्यांनी त्यांची भाजीपाला विक्री केंद्र बंद केली आहेत. अनेक गटातील काही सदस्य बाधित झाले. काहींचा मृत्यू झाला, यामुळे भाजीपाला विक्री बंद केली आहे. याशिवाय दुकानांची वेळही गैरसोयीची असल्यामुळे भाजीपाला किती भरायचा, याचा अंदाज येत नाही. उन्हाळ्याचे दिवस असल्याने माल लगेच खराबही होतो. - दिलीप गायधनी, भाजीपाला विक्री केंद्र संचालक.