टमाटा फेकला उकिरड्यावर

By admin | Published: February 18, 2017 12:38 AM2017-02-18T00:38:48+5:302017-02-18T00:39:05+5:30

कवडीमोल : उत्तम दर्जा असूनही भाव न मिळाल्याने शेतकरी नाराज

Tomato feather brow | टमाटा फेकला उकिरड्यावर

टमाटा फेकला उकिरड्यावर

Next

द्याने : गेल्या काही दिवसांपासून शेतमालाला भाव नसल्याने परिसरातील शेतकरी मेटाकुटीस आला असून, नगरसूल, देवळा येथील शेतकऱ्यांनी कांदापीक शेतात जाळले, तर टमाट्यात मेंढ्या सोडून नांगरून टाकला आहे.  टमाटा पिकास भाव नसल्यामुळे झालेला खर्चही निघणे मुस्कील झाले आहे. आज बळीराजा अत्यंत वाईट परिस्थितीतून वाटचाल करीत आहे. फोपीर (ता. बागलाण) येथील शेतकरी समाधान पोपट भामरे यांनी नोव्हेंबर महिन्यात हातउसनवार  करीत रोपवाटिकेतून वीस हजार रुपयांचे टमाटा रोप लागवडीसाठी घेतले. मिल्चिंग पेपर, ठिबक सिंचन, तार, बांबू, औषध फवारणी, कामासाठी लागणारे मजूर असा आजपर्यंतचा खर्च एकूण दीड ते दोन लाखांच्या आसपास केला.  २ फेब्रुवारीला पन्नास क्रेट टमाट्याचा पहिला तोडा निघाल्याने गुजरात राज्यातील सूरत येथील बाजारापेठेत विक्र ीसाठी पाठवला. केवळ ४० ते ५० रुपये प्रति क्रेट विक्र ी झाली.  उत्पन्न खर्च तर निघालाच नाही परंतु गाडीभाडेही खिशातून द्यावे लागले. तरीही न डगमगता पुढे चांगला भाव टमाटा देईल या आशेने या पिकावर लक्ष केंद्रित केले व दोन पैसे पदरी पडतील अशी अपेक्षा होती. मात्र दोन दिवसांपूर्वी व्यापारी बघून गेले होते टमाटा बाजारभाव पडल्याचे खर्च तर सोडाच उलट खिशातून खर्च करावा लागला. दोन एकर क्षेत्रात पाच ते सहा लाख रुपये उत्पन्न अपेक्षित होते. वैतागलेले शेतकरी समाधान भामरे यांनी दोन एकर क्षेत्रातील टोमॅटो पिकापासून उत्पादनखर्चही मिळणे शक्य नसल्यामुळे दोन एकरातील टमाटा पिकात जनावर घालत उकिरड्यावर फेकून दिला आहे. त्यांना उत्पादन खर्च तर सोडाच उलटे कर्ज झाले आहे. परिणामी परिसरातील शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. (वार्ताहर )

Web Title: Tomato feather brow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.