करप्याच्या प्रार्दुभावामुळे टोमॅटो भुईसपाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 07:40 PM2019-07-24T19:40:17+5:302019-07-24T19:40:46+5:30
मानोरी : येवला तालुक्यातील सातारे येथील शेतकरी वाल्मिक शेळके यांचा १ एकर टोमॅटोचा प्लॉट महिना भरापूर्वी लागवड केलेला असताना त्यावर करप्या नावाच्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने टोमॅटो भस्मसात झाल्याने शेळके यांनी टोमॅटो प्लॉट उपटुन फेकला असून शेळके यांना सुमारे ६० हजाराचा तोटा सहन करावा लागला असून झाडाला टोमॅटो सुद्धा बघायला मिळाले नसल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे.

महाराष्ट्र शासनाने तात्काळ पाऊल उचलून मक्यावरील लष्करी अळीने व करप्या नावाच्या रोगाने जे पिके उदध्वत झाले. असेल तेथे तात्काळ जावुन पाहाणी करून पंचनामा करून भरपाई द्यावी. अशी मागणी शेतकरी करत आहे. गेल्या पाच महिन्यापासून दुष्काळाच्या यातना सहन करत आहे. या भागात जून महिन्याच्या सुरु वातीलाच मान्सून पूर्व अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर बळीराजा तात्पुरता सुखावला असून या मान्सून पूर्व पावसाच्या जोरावर येवला तालुक्यातील पश्चिमेकडील धुळगांव, दहेगांव, सातारे, शेवगे, पिंपळगाव लेप, जऊळके, मानोरी, देशमाने, मुखेड फाटा आदी भागातील शेतकरी वर्ग टोमॅटो पिकाची गेल्या महिन्यापूर्वी मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात व्यस्त झाल्याचे दिसून येत होते.
मात्र आता करप्या नावाच्या रोगाने झडप घातल्याने शेतकरी वर्ग हा कर्जाच्या खाहीत लोटला जात आहे. आधीच मक्यावरील लष्करी अळीच्या संकटात असतांना लगेच टोमॅटोवर करप्या रोग आल्याने शेतकरी बांधवांना सातत्याने औषध फवारणी करावी लागत असून शेतकरी हतबल झाला आहे. यावेळी वाल्मिक शेळके, गणपत शेळके, सचिन शेळके, माऊली गचाले आदी उपस्थित होते.
सध्या सर्वत्र लष्करी अळीने थैमान घातले असून मका पाठोपाठ टोमॅटो देखील कारपण्यास सुरु वात झाली आहे. मी मिहनाभरापूर्वी माङया शेतात टोमॅटोची लागवड केली होती. त्यासाठी मला साधारण ६२ हजार रु पयांच्या आसपास खर्च झाला असून मला टोमॅटो लागवडीत झाडाला एक टोमॅटो देखील बघायला मिळाले नसून सर्व खर्च पाण्यात गेला असून कर्जबाजारी होण्याची वेळ माङयावर आली आहे.
- वाल्मिक शेळके, शेतकरी, सातारे, ता.येवला.