टमाटे कवडीमोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 06:28 PM2018-09-08T18:28:55+5:302018-09-08T18:29:36+5:30
टमाटे उत्पादनातून खर्च भरून निघणे अवघड झाल्याने उत्पादक शेतकरी हवालदिल झाला असून, २० किलोच्या प्रति क्र ेटला ४० ते ५० रु पये भाव मिळत असल्याने शेतकरी तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत. बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये निर्यात होणारा टमाटे माल सीमाबंद असल्याने याचा फटका सर्वसामान्य शेतकऱ्यांना बसत आहे.
मानोरी/येवला : टमाटे उत्पादनातून खर्च भरून निघणे अवघड झाल्याने उत्पादक शेतकरी हवालदिल झाला असून, २० किलोच्या प्रति क्र ेटला ४० ते ५० रु पये भाव मिळत असल्याने शेतकरी तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत. बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये निर्यात होणारा टमाटे माल सीमाबंद असल्याने याचा फटका सर्वसामान्य शेतकऱ्यांना बसत आहे.
मानोरी बुद्रुक, खडकीमाळच्या शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात घेतलेल्या टमाटे पिकासाठी सुतळी, टोकर, मल्चिंग पेपर, कीटकनाशके फवारणी, मजुरीसाठी उसनवारी, दुकानदारांची उधारीही देणे बाकी असल्याने ती द्यावी कशी? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. टमाटे एक दिवसाआड तोडावे लागत असल्याने त्यासाठी मजूर मिळणेदेखील अवघड झाले आहे. त्यातही वाहतुकीसाठी वाहनांचीदेखील वानवा भासत आहे. क्षमतेपेक्षा जास्त टमाटे गाड्यांमध्ये वाहतूक सुरू आहे.
एवढे करूनही मोठ्या प्रमाणात केलेल्या मेहनतीवर आणि खर्चावर पाणी फेरत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे हवालदिल झालेल्या बºयाच शेतकºयांनी टमाटे विक्र ीसाठी न नेता जनावरांना चारा म्हणून उपयोग केला आहे, तर काही शेतकºयांनी टमाटे कमी दराअभावी रस्ताच्या कडेलादेखील ओतून दिल्याचे दिसून येत आहे.
४काही शेतकºयांना मजूर मिळत नसल्याने शक्य होईल तेवढे टमाटे तोडतात आणि पर्याय उपलब्ध नसल्याने काही टमाटे लाल होऊन जातात. टमाटे तोडण्यासाठी एका क्र ेटला २० रु पयांपर्यंत मजुरी, २५ रु पयांपर्यंत प्रति क्रेटला गाडी भाडे द्यावे लागत आहे.