कोटमगाव परिसरात अल्पशा पाण्यावर टमाट्याची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 05:48 PM2019-06-24T17:48:37+5:302019-06-24T17:49:04+5:30
येवला : तालुक्यातील पूर्व भागात अद्याप पेरणी योग्य मुसळधार पाऊस झालेला नसून गत वर्षीप्रमाणे याही वर्षी खिरपाच्या पेरण्यांना अद्याप सुरु वात झालेली नसून येवला तालुक्यातील कोटमगाव परिसरात साठवून ठेवलेल्या अल्पशा पाण्याच्या साठ्यावर ड्रीपच्या आधारावर टोमॅटो पिकांची लागवड शेतकº्यांनी सुरू केल्याचे चित्र दिसत आहे.
येवला : तालुक्यातील पूर्व भागात अद्याप पेरणी योग्य मुसळधार पाऊस झालेला नसून गत वर्षीप्रमाणे याही वर्षी खिरपाच्या पेरण्यांना अद्याप सुरु वात झालेली नसून येवला तालुक्यातील कोटमगाव परिसरात साठवून ठेवलेल्या अल्पशा
पाण्याच्या साठ्यावर ड्रीपच्या आधारावर टोमॅटो पिकांची लागवड दीपक कोटमे यांच्यासह अनेक शेतकº्यांनी सुरू केल्याचे चित्र दिसत आहे.
येवला तालुक्यात मान्सूनच्या पावसाने हजेरी लावली असून शेतकर्यांच्या आशा काहीशा पल्लवित झाल्याचे दिसून येत असून मात्र खरीप हंगामातील पिकांच्या लागवडीसाठी हा पाऊस पुरेसा नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. गत वर्षी पडलेल्या अल्पशा पावसाच्या भरवशावर येवला मंडळात हजरो हेक्टर जमिनीतील पिके करपून गेल्याने हाती एक रु पयांचे उत्पन्न पडले नसताना देखील प्रशासनाच्या सावळ्या गोंधळामुळे अद्यापही येवला मंडळातील गावे शासनाकडून नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत असून शासनाने येवला मंडळ तात्काळ दुष्काळ जाहीर करण्याची मागणी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.
बळीराजाला मान्सून ने अल्पसा दिलासा दिला असला तरी गत वर्षी सारखी चूक होऊ नये म्हणून यावर्षी खिरपाच्या हंगामातील पिकांची लागवड मुसळधार पावसानंतर करणार असल्याचे बोलले जात आहे .त्यामुळे मागच्या वर्षीपासून साठवून ठेवलेल्या पाण्यावरच शेतकरी टोमॅटो पिकाची लागवड करत आहे. विहिरीत मुबलक पाणीसाठा नसल्याने टोमॅटो लागवड करणार्या शेतकरी वर्गाने ड्रीपचा आधार घेत आहे.