टमाटे अवघे पाच रुपये किलो, तर खाद्यतेलाने घेतली पुन्हा उसळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:11 AM2021-07-05T04:11:12+5:302021-07-05T04:11:12+5:30
चौकट- ढोबळी मिरची ३२ रु. किलो येथील बाजार समितीत ढोबळ्या मिरचीला सरासरी ३२.५० रुपये किलोचा दर मिळत आहे, तर ...
चौकट-
ढोबळी मिरची ३२ रु. किलो
येथील बाजार समितीत ढोबळ्या मिरचीला सरासरी ३२.५० रुपये किलोचा दर मिळत आहे, तर वांगी १५ पासून ४० रुपये किलोपर्यंत विकली जात आहेत. पाऊस नसल्याने भाजीपाल्याच्या आवकेवर काहीसा परिणाम झाला असल्याचे दिसून येत आहे.
चौकट-
सफरचंद १५० रु. किलो
घाऊक बाजारात फळांची आवक कमी झाली आहे. सफरचंद घाऊक बाजारातच सरासरी १५० रुपये किलो या दराने विकली जात आहेत. यामुळे किरकोळ बाजारात तर याचे दर अधिकच वाढलेले दिसतात. आरक्ता डाळिंब ५० पासून ७५ रुपये किलोपर्यंत घाऊक बाजारात मिळतात. किरकोळ बाजारातील दर यापेक्षाही अधिक आहेत.
चौकट-
खाद्यतेल पुन्हा महागले
मागील काही दिवसांत कमी झालेले खाद्यतेलाचे भाव पुन्हा वाढले असून, सोयाबीन तेल लिटरमागे सहा ते सात रुपयांनी वाढले आहे, तर मूगडाळ, तूरडाळ यांचे दर दहा रुपयांनी खाली आले असल्याचे दिसून येत आहे. मूगडाळ सध्या साधारणपणे ९५ ते १०० रुपये किलोपर्यंत आहे.
कोट-
अख्खा जून महिना कोरडा गेल्याने आता भाजीपाला पिके जगविताना कसरत करावी लागत आहे. विहिरींना असलेल्या पाण्यावरच पिके उभी आहेत. याशिवाय वातावरण बदलत असल्यामुळे फवारणीचा खर्चही वाढला आहे.
-मनोहर घोडेराव, शेतकरी
कोट-
आठवड्यातील दोन दिवस दुकान बंद राहत असल्याने सोमवार, मंगळवार, असे दोन दिवस किराणा बाजारात थोडीफार ग्राहकांची वर्दळ असते. इतर दिवसमात्र थंड असतात. सध्या महिनाअखेर असल्यामुळे खरेदीवर परिणाम झाला आहे.
-शेखर दशपुते, किराणा व्यापारी
कोट-
दरराेज कोणत्या ना कोणत्या वस्तूंच्या दरामध्ये होणाऱ्या चढ-उतारामुळे महिन्याचे बजेट कसे आखावे, हेच समजत नाही. दोन भाज्या करायच्या म्हटले, तर किमान १०० ते १५० रुपये केवळ भाज्यांसाठी खर्च करावे लागतात.
-रोहिणी पगारे, गृहिणी