कळवण तालुक्यातील टमाटा मध्यप्रदेश गुजरातमधे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 02:45 PM2020-07-30T14:45:26+5:302020-07-30T14:47:10+5:30
वणी : दिंडोरी तालुक्यात टमाट्याची लागवड सुरु आहे. या टमाट्याचे उत्पादन सुमारे तीन महीन्याने सुरु होणार आहे, मात्र कळवण तालुक्यातुन सुमारे पन्नास पिकअप टमाटा विक्र ीसाठी गुजरात व मध्यप्रदेश येथे प्रतीदिन जात असल्याने त्या भागातील आर्थिक उलाढाल वाढली आहे.
वणी : दिंडोरी तालुक्यात टमाट्याची लागवड सुरु आहे. या टमाट्याचे उत्पादन सुमारे तीन महीन्याने सुरु होणार आहे, मात्र कळवण तालुक्यातुन सुमारे पन्नास पिकअप टमाटा विक्र ीसाठी गुजरात व मध्यप्रदेश येथे प्रतीदिन जात असल्याने त्या भागातील आर्थिक उलाढाल वाढली आहे.
कळवण अभोणा, कनाशी, पाडघण, शिरसमणी, ओतुर, साकोरे परिसरातील टमाटा सद्यस्थितीत गुजरात राज्यातील सुरत, भरु च, अहमदाबाद, झणगाव येथे हा विक्र ीसाठी जात आहे. तर मध्यप्रदेशातील इंदोर येथेही या टमाट्याला मागणी वाढली असून तेथेही कळवण तालुक्यातील टमाटा मोठ्या प्रमाणावर विक्र ीसाठी जात आहे.
साधारणत: पिकण्याच्या पूर्वस्थितीतील टमाटा एका पिकअप मधे भरु न विक्र ीसाठी पाठविण्यात येतो. सदर माल पोहचण्यासाठी आठ ते दहा तासांचा कालावधी लागतो, कॅरेटमधे पेपर लावून, त्यात टमाटा टाकुन कॅरेटवरचे आच्छादन लावुन पॅकींग केली जाते. त्यामुळे अंतर्गत उष्णतामानाने टमाट्याची लाली वाढते व हा दर्जेदार टमाटा विक्र ीसाठी मागणीप्रमाणे पाठविण्यात येतो अशी माहिती ट्रान्सपोर्ट मालक संदिप शिंदे यांनी दिली.
कळवण तालुक्यातील व्यापाऱ्यांबरोबर दिंडोरी तालुक्यातील व्यापारी यांच्या मार्फत या टमाट्याची खरेदी केली जाते. सुमारे पन्नास पिकअप टमाटा दररोज विक्र ीसाठी पाठविण्यात येत आहे. सध्या नाशिक जिल्ह्यात मात्र कळवण तालुक्यात सध्या टमाटा उत्पादित होत आहे. आकारमान, दर्जा, प्रतवारी व रंग तसेच चव यात हा टमाटा उजवा आहे. व या दर्जेदार टमाट्याला मागणीही आहे.
टमाटा खरेदी विक्र ी प्रणालीमुळे आर्थिक उलाढाल गतीमान झाली आहे. कृषी उत्पादनात अग्रेसर असणाºया कळवण तालुक्यातील शेतकरीवर्गाला मार्केटिंगचे स्कील असल्यामुळे कांदा, मिरची, टमाटा, मका यांच्या उत्पादनात त्यांना विक्र ीच्या माध्यमातुन समाधानकारक दर मिळतात, हे त्यांच्या नियोजनाचे व मेहनतीचे फळ असुन टमाटा विक्र ीच्या माध्यमातुन ही बाब आता अधोरेखीत झाली आहे.