टमाटा ३५ रुपये किलो; वर्षानंतर दरात सुधारणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 09:16 PM2020-07-11T21:16:22+5:302020-07-12T01:59:42+5:30
पंचवटी : टमाटा शेतमालाचा हंगाम सुरू झाला असून, यंदा हंगामाच्या सुरुवातीलाच टमाटा उत्पादक शेतकऱ्यांना २० किलो जाळीला ७०० ्न्नरुपयेपर्यंत दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. दोन दिवसांपूर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीत १५ ते २० रु पये प्रति किलो बाजारभाव मिळालेल्या टमाट्याला किलो मागे ३५ रुपये दर मिळाला.

गुरुवारी बाजार समितीत सुमारे २२७० जाळ्याची आवक झाली, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.
गेल्या आठवड्यात जिल्ह्यातील अनेक भागांत पाऊस झाला या पावसामुळे शेतमाल भिजला तर काही ठिकाणी फुलोरा झडून गेल्याने आवक घटली त्याचाच परिणाम बाजारभावावर जाणवला आहे. विशेष म्हणजे गेल्या काही महिन्यांपासून भारत-पाकिस्तान बॉर्डर बंद असल्याने पाकिस्तान बांगलादेश याठिकाणी टमाटा माल पाठविणे बंद झाले आहे. परिणामी बाजारभाव घसरले होते.
-------------------
दळणवळणाचा खर्च सुटत नव्हता
अनेक दिवसांपासून टमाटा ५ ते १० रु पये किलो दराने विक्र ी व्हायचा. दळणवळण खर्च सुटत नसल्याने अनेक शेतकºयांनी टमाटा खुडा बंद केला होता. सध्या टमाटा हंगाम सुरू झाला असून, हंगामाच्या
सुरु वातीला टमाटा उत्पादक शेतकरी बांधवांना सध्या चांगला बाजारभाव मिळाल्याने तूर्तास शेतकºयांनी समाधान व्यक्त केले आहे. बाजार समितीत सध्या ४५० ते ७०० रु पये पर्यंत प्रति २० किलो टमाटा जाळीला बाजारभाव मिळत आहे.