शहरात उद्या पल्स पोलिओ मोहीम

By admin | Published: February 19, 2016 11:30 PM2016-02-19T23:30:52+5:302016-02-19T23:31:25+5:30

शहरात उद्या पल्स पोलिओ मोहीम

Tomorrow in the city pulse polio campaign | शहरात उद्या पल्स पोलिओ मोहीम

शहरात उद्या पल्स पोलिओ मोहीम

Next

नाशिक : महापालिकेच्या वतीने रविवारी (दि.२१) शहरात पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात येणार असून, त्यासाठी दोन हजारांहून अधिक अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. रविवारी होणाऱ्या या मोहिमेचे महापौर अशोक मुर्तडक करणार आहेत.
ही मोहीम अचूकपद्धतीने पार पडावी यासाठी प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे १८५७ कर्मचारी १३६ पर्यवेक्षक, प्रभाग अधिकारी म्हणून निवासी वैद्यकीय अधिकारी अशी टीम उभारण्यात आली आहे. रविवारी मोहीम पार पडल्यानंतरही कर्मचारी घरोघर जाऊन पोलिओ डोस दिल्याची खात्री करून घेणार आहेत.
सदर कार्यवाही सलग पाच दिवस चालणार आहे. त्यासाठी एकूण ६१७ टीम असून, १२७ आपीपीआय पर्यवेक्षक काम करतील. त्यासाठी प्रत्येक पथकात दोन कर्मचाऱ्यांचे एक पथक आणि पाच पथक मिळून एक पर्यवेक्षक याप्रमाणे मूल्यमापन करणार आहेत. यात महापालिकेबरोबरच खासगी वैद्यकीय महाविद्यालये आणि नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थीही सहभागी होणार आहेत, असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बी. आर. गायकवाड यांनी कळविले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Tomorrow in the city pulse polio campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.