उद्या संपूर्ण शहरात पाणीपुरवठा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 02:03 AM2019-09-20T02:03:43+5:302019-09-20T02:04:41+5:30
शहराच्या विविध भागांत पाणीपुरवठ्याची तातडीची कामे करावी लागणार असल्याने शनिवारी संपूर्ण शहरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे, तर रविवारी (दि.२२) सकाळी कमी दाबाने आणि कमी प्रमाणात पाणीपुरवठा होणार आहे.
नाशिक : शहराच्या विविध भागांत पाणीपुरवठ्याची तातडीची कामे करावी लागणार असल्याने शनिवारी संपूर्ण शहरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे, तर रविवारी (दि.२२) सकाळी कमी दाबाने आणि कमी प्रमाणात पाणीपुरवठा होणार आहे.
गंगापूर धरणावरील पंपिंग स्टेशन येथून बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्र जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम करायचे आहे. तसेच पंचवटी जलशुद्धीकरण केंद्र येथील ९०० मिमी जलवाहिनी बदलण्यात येणार आहे, तर कोणार्क नगर येथे रायझिंग मेन जोडणी करणे, म्हसरूळ येथील रायझिंग मेन तसेच व्हॉल्व्ह बदलणे, कालिका पंपिंग स्टेशन येथील व्हॉल्व्ह दुरु स्ती करणे, गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्र येथील रॉ वॉटर व्हॉल्व्ह दुरु स्ती करणे, नाशिकरोड पवारवाडी येथील रायझिंग मेन दुरु स्त करणे, सिडकोतील मुख्य लाइनवर अंबड येथे क्र ॉस कनेक्शन करणे, शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्र येथे रायझिंग मेन लाइन दुरु स्ती करणे अशी अनेक दुरुस्तीची कामे एकाच वेळी म्हणजेच शनिवारी (दि.२१) रोजी करण्यात येणार आहे. त्यामुळे गंगापूर धरण व मुकणे धरण पंपिंग स्टेशन येथून शनिवारी होणारा पाणीपुरवठा सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत बंद ठेवावा लागणार आहे.