उद्या गोदा स्वच्छता अभियान

By admin | Published: June 3, 2017 01:01 AM2017-06-03T01:01:34+5:302017-06-03T01:07:25+5:30

नाशिक : महापालिकेच्या वतीने जनसहभागातून गोदावरी स्वच्छता अभियानाची सुरुवात पर्यावरण दिनाचे औचित्य साधत रविवारी (दि.४) करण्यात येणार आहे.

Tomorrow Clean Sanitation Campaign | उद्या गोदा स्वच्छता अभियान

उद्या गोदा स्वच्छता अभियान

Next

 लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : महापालिकेच्या वतीने जनसहभागातून गोदावरी स्वच्छता अभियानाची सुरुवात पर्यावरण दिनाचे औचित्य साधत रविवारी (दि.४) करण्यात येणार असून गोदावरी, नासर्डी, वाघाडी व वालदेवी नदीकिनारी ११ ठिकाणी सदर मोहीम राबविण्यात येणार आहे.
गोदावरी स्वच्छता अभियानाच्या नियोजनाबाबत महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्या उपस्थितीत स्वयंसेवी, सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींसमवेत बैठक झाली. यावेळी उपआयुक्त रोहिदास दोरकुळकर यांनी मोहिमेची माहिती दिली. रविवारी सकाळी ७ ते १० वाजेपर्यंत गोदावरी नदीवरील होळकर पुल ते गौरी पटांगण, गौरी पटांगण ते टाळकुटेश्वर पूल, लक्ष्मीनारायण घाट, तपोवन, टाकळी पूल ते परिसरातील घाट, नांदूर मानूर परिसर व घाट, नासर्डीवरील आयटीआय पूल ते सिटी सेंटर मॉल, तिडके कॉलनी, मुंबईनाका, वाघाडीवरील लक्ष्मणझुला तसेच वालदेवी नदीवरील रोकडोबावाडी पूल ते कॅम्प पूल, विहितगाव ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविली जाणार आहे. यावेळी आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी सांगितले.

Web Title: Tomorrow Clean Sanitation Campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.