‘लोकमत सरपंच अवॉर्ड’चे उद्या वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 01:03 AM2019-02-27T01:03:37+5:302019-02-27T01:04:14+5:30

संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’चे गुरुवार, दि. २८ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता मुंबई - आग्रा रोडवरील हॉटेल एक्स्प्रेस इनमधील रॉयल हॉलमध्ये वितरण होणार आहे.

 Tomorrow delivery of 'Lokmat Sarpanch Award' | ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’चे उद्या वितरण

‘लोकमत सरपंच अवॉर्ड’चे उद्या वितरण

Next

नाशिक : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’चे गुरुवार, दि. २८ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता मुंबई - आग्रा रोडवरील हॉटेल एक्स्प्रेस इनमधील रॉयल हॉलमध्ये वितरण होणार आहे. या स्पर्धेत कोण बाजी मारतो याबाबत गावागावांतील सरपंचांमध्ये उत्सुकता लागली आहे. गेल्या १९ फेबु्रवारी रोजी लोकमतच्या नाशिक शहर कार्यालयात झालेल्या ज्युरी मंडळाच्या बैठकीत बारकोड पद्धतीने विविध १३ कॅटेगिरीमधील सरपंचांची निवड निश्चित करण्यात आली असून, ही सर्व नावे गुलदस्त्यात आहेत.
गावाच्या विकासाचे स्वप्न उराशी बाळगून त्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या विजेत्या सरपंचांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सौ.शीतल सांगळे, बीकेटीचे महाराष्टÑातील अ‍ॅग्री सेलचे सहायक व्यवस्थापक जुबेर शेख, बीकेटीचे अधिकृत वितरक सूरज धुत, सुयोजित ग्रुपचे संचालक अनंत राजेगावकर आदी मान्यवर उपस्थित राहाणार आहेत.
यावेळी प्रमुख वक्ते म्हणून अखिल भारतीय सरपंच परिषदेचे संस्थापक चेअरमन सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी येथील जयंत पाटील तसेच महिलाराज सत्ता आंदोलनाच्या अमरावती विभागीय समन्वयक, यवतमाळ जिल्ह्यातील पुसदच्या माजी सरपंच अर्चना जतकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
बीकेटी टायर्स या उपक्रमाचे मुख्य प्रायोजक तर पतंजली आयुर्वेद सहप्रायोजक आहेत. राज्यात लोकमतने प्रथमच सुरू केलेल्या या उपक्रमास सलग दुसऱ्या वर्षीही जिल्ह्यातील सरपंचांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, विविध कॅटेगिरीमध्ये जिल्ह्यातील ३००पेक्षा अधिक सरपंचांनी प्रवेशिका दाखल केल्याने मोठ्या प्रमाणात चुरस निर्माण झाली आहे. या सोहळ्यास स्पर्धेत सहभागी सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन लोकमततर्फे करण्यात आले आहे.
११ कॅटेगिरीसह दोन विशेष पुरस्कार
सरपंचांनी गावात जल, वीज व्यवस्थापन, शिक्षण, स्वच्छता, आरोग्य, पायाभूत सुविधा, ग्रामरक्षण, पर्यावरण इ. प्रशासन/लोकसहभाग, रोजगारनिर्मिती, कृषी तंत्रज्ञान या ११ कॅटेगिरीत केलेल्या कामांची दखल घेऊन या प्रत्येक क्षेत्रासाठी ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ दिले जाणार आहे. याशिवाय उदयोन्मुख नेतृत्व आणि सरपंच आॅफ द इयर हे दोन विशेष पुरस्कार देण्यात येणार आहेत.
कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहाणारे जयंत पाटील हे सन १९९५ पासून कुर्डुवाडी ग्रामपंचायतीत सरपंच, उपसरपंच व सदस्य म्हणून कार्यरत आहेत. २००३ मध्ये त्यांनी राज्यस्तरीय सरपंच संघटनेची स्थापना केली. २००४ मध्ये त्यांनी कुर्डुवाडी येथे पहिले राज्यस्तरीय सरपंच अधिवेशन आयोजित केले होते. या अधिवेशनात राज्यभरातील १४ हजार सरपंच उपस्थित होते. सध्या ते ग्रामविकास मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत.
महिलाराज सत्ता आंदोलनाच्या अर्चना जतकर या पुसदच्या माजी सरपंच असून, दोन पंचवार्षिक त्या सरपंच म्हणून कार्यरत होत्या. सध्या त्या जिल्हा परिषद सदस्य आहेत. पंचायतराज आणि आमचं गाव आमचा विकास या दोन संस्थांवर त्या तज्ज्ञ प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.

Web Title:  Tomorrow delivery of 'Lokmat Sarpanch Award'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.