उद्या दुपारी दीड वाजेपर्यंत घटस्थापनेचा मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 01:31 AM2018-10-09T01:31:17+5:302018-10-09T01:31:51+5:30

येत्या बुधवार (दि.१०) पासून नवरात्रोत्सवास प्रारंभ होत असून बुधवारी सकाळी ७.२६ वाजता प्रतिपदा समाप्ती होत असली तरी त्यादिवशी ब्राह्यमुहूर्त म्हणजे पहाटे ५ वाजेपासून दुपारी १ वाजून ३६ मिनिटांपर्यंत घटस्थापना करता येईल,

 Tomorrow morning at around 1:30 pm | उद्या दुपारी दीड वाजेपर्यंत घटस्थापनेचा मुहूर्त

उद्या दुपारी दीड वाजेपर्यंत घटस्थापनेचा मुहूर्त

googlenewsNext

नाशिक : येत्या बुधवार (दि.१०) पासून नवरात्रोत्सवास प्रारंभ होत असून बुधवारी सकाळी ७.२६ वाजता प्रतिपदा समाप्ती होत असली तरी त्यादिवशी ब्राह्यमुहूर्त म्हणजे पहाटे ५ वाजेपासून दुपारी १ वाजून ३६ मिनिटांपर्यंत घटस्थापना करता येईल, असे सोलापूरचे दाते पंचांगकर्ते मोहनराव दाते यांनी स्पष्ट करतानाच मंगळवारी (दि.९) अमावास्या समाप्तीला घटस्थापना करू नये, असे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.  येत्या बुधवारी (दि.१०) आश्विन शु.प्रतिपदा समाप्ती सकाळी ७.२६ वाजता आहे. सूर्याेदयानंतर एक मुहूर्तापेक्षा जास्ती (सुमारे ४५ मिनिटे) प्रतिपदा असते तेव्हा प्रतिपदेच्या दिवशी घटस्थापना, नवरात्रारंभ करावे, असे वचन आहे. यावर्षी दिनांक १० आॅक्टोबर रोजी घटस्थापना होत असून नवरात्रारंभ होत आहे. १० आॅक्टोबर रोजी सकाळी ७.२६ वाजता प्रतिपदा समाप्ती होत असली तरी १० आॅक्टोबर रोजी ब्राम्ह मुहूर्तापासून म्हणजे पहाटे ५ वाजल्यापासून मध्यान्ह समाप्तीपर्यंत दुपारी १ वाजून ३६ मिनिटांपर्यंत घटस्थापना करता येते. सकाळी ७.२६ वाजेपूर्वी घटस्थापनेची घाई करण्याची आवश्यकता नाही. ९ आॅक्टोबर रोजी मात्र अमावास्या समाप्ती घटस्थापना करू नये, असेही दाते यांनी सांगितले. अशौचामुळे ज्यांना १० आॅक्टोबर रोजी घटस्थापना करणे शक्य होणार नाही त्यांनी अशौच निवृत्तीनंतर (अशौच संपल्यावर) ११, १३, १६ आणि १७ आॅक्टोबर यापैकी कोणत्याही दिवशी घटस्थापना करावी व १८ आॅक्टोबर रोजी नवरात्रोत्थापन करावे.  महालक्ष्मी पूजन (घागरी फुंकणे) दिवशी मध्यरात्री अष्टमी तिथीवर देवीचे पूजन करण्याची प्रथा आहे. अशी अष्टमी १६ आॅक्टोबर रोजी मध्यरात्री मिळते त्यामुळे त्या दिवशी महालक्ष्मी पूजन दिलेले आहे. दुर्गाष्टमी १७ आॅक्टोबर रोजी आहे. विजयादशमी, दसरा, सीमोल्लंघन हे १८ आॅक्टोबर रोजी असून साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला दसरा हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी विजय मुहूर्तावर अनेक लोक आपल्या नवीन उपक्रमाचा आरंभ करतात. हा विजय मुहूर्त दुपारी २.२० ते ३.०७ या वाजेदरम्यान आहे.
यंदा नवव्या दिवशी दसरा
दि. १८ आॅक्टोबर रोजी दसरा, नवरात्रोत्थापन (नवरात्र समाप्ती) व पारणा आहे. सर्वसाधारणपणे घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत ९ किंवा १० दिवसांचे अंतर असते. तिथीच्या क्षयवृद्धीमुळे असा फरक असतो. यावर्षी घटस्थापनेपासून नवव्या दिवशी दसरा आहे. यापूर्वी अनेक वेळेस असे झालेले आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला दसरा हा कितव्याही दिवशी आला तरी शुभच असतो, असेही दाते यांनी सांगितले.

Web Title:  Tomorrow morning at around 1:30 pm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.