भोपळ्याचे उत्पादन घेण्याकडे कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 11:15 PM2018-07-03T23:15:37+5:302018-07-03T23:17:38+5:30

वणी : द्राक्ष उत्पादनातील असमतोल, खरेदीदारांकडून होणारी फसवणूक, निसर्गाचा लहरीपणा व इतर अडचणी लक्षात घेता भोपळ्याच्या उत्पादनाकडे बागायतदारांचा कल वाढला आहे. द्राक्षबागांमध्ये आंतरपीक घेऊन अतिरिक्त उत्पन्नाचा पर्याय उत्पादकांनी शोधला आहे. दिंडोरी तालुक्यात हजारो एकर द्राक्षबागा असून, विविध जातीच्या द्राक्षाची लागवड करण्यात अग्रभागी असणारा उत्पादक आता भोपळ्याचे आंतरपीक घेत आहे.

Tomorrow's production of pumpkin | भोपळ्याचे उत्पादन घेण्याकडे कल

भोपळ्याचे उत्पादन घेण्याकडे कल

Next
ठळक मुद्देभोपळ्याला मागणी वाढलीदिंडोरी, निफाड व कळवण तालुक्यात मोठ्या प्रमाणावर भोपळ्याचे उत्पादन

वणी : द्राक्ष उत्पादनातील असमतोल, खरेदीदारांकडून होणारी फसवणूक, निसर्गाचा लहरीपणा व इतर अडचणी लक्षात घेता भोपळ्याच्या उत्पादनाकडे बागायतदारांचा कल वाढला आहे. द्राक्षबागांमध्ये आंतरपीक घेऊन अतिरिक्त उत्पन्नाचा पर्याय उत्पादकांनी शोधला आहे.
दिंडोरी तालुक्यात हजारो एकर द्राक्षबागा असून, विविध जातीच्या द्राक्षाची लागवड करण्यात अग्रभागी असणारा उत्पादक आता भोपळ्याचे आंतरपीक घेत आहे. माळे चंडिकापूर अंबानेर, मावडी वणी व तळेगाव या भागामध्ये भोपळा लागवडीस अग्रक्र म दिला जातो आहे. पूर्वी वरद जातीच्या भोपळ्याचे उत्पादन घेतले जात असे; मात्र आता निर्मल ४८ या जातीच्या भोपळ्याचे उत्पादन घेण्याकडे उत्पादकांचा कल वाढल्याची माहिती उत्पादक टिनू देशमुख यांनी दिली.
भोपळ्याचे उत्पादन घेणारे शेतकरी ५३८ किंवा ६३९अशा पद्धतीने लागवड करतात. बी किंवा वेल रोपे लागवडीपासून उत्पादन घेण्यात येते. काळी मध्यम भारी, पाण्याचा निचरा होणारी जमीन यास आवश्यक असते. ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देण्याची पद्धत वापरण्यात येते. लागवडीनंतर ४५ ते ६० दिवसांत पहिली खुडणी करण्यात येते. एकंदरित जातीनुसार सुमारे १०० ते १२५ क्र ेट खुडणी दर दोन दिवसांनी होते. एका क्र ेटमध्ये १६ ते १८ भोपळे बसतात. एक फूट लांबीच्या भोपळ्यांच्या एका क्रेटला प्रतवारी व दर्जानुसार १५० ते २०० रु पये असा भाव सध्या मिळतो आहे. एकरी खर्च अंदाजे ३० हजार रु पये लागवड ते उत्पादन घेण्यापर्यंत येतो. ४ महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपर्यंत उत्पादन मिळते. तर उत्पादनाच्या उत्तरार्धापर्यंत अंदाजे एक ते दीड लाख रु पये उत्पन्न मिळते. भावाच्या चढ-उतारावर उत्पन्नाची आकडेवारी अवलंबून असते. भोपळ्याच्या वेलीला प्रत्येक शेंडा मारावा लागतो तद्नंतर कळी उमलते व त्याचे रूपांतर फळात होते. भुरी, नागअळी, किडीचा प्रादुर्भाव डाउनी, भुरी, नागअळी या रोगांचा व किडीचा प्रादुर्भाव भोपळ्यावर होतो. दरम्यान, नाशिक जिल्ह्यात दिंडोरी, निफाड व कळवण तालुक्यात मोठ्या प्रमाणावर भोपळ्याचे उत्पादन घेतले जाते. दर दोन दिवसांनी खुडणी करणाऱ्या भोपळ्यापासून मिळणारे उत्पन्न खात्रीशीर असून, विविध आयुर्वेद आचार्यांनी हृदयविकारावर भोपळ्याचा रस व तत्सम आजारावर प्रभावी व रामबाण उपायासाठी भोपळा उपयुक्त असल्याबाबतचे मत व्यक्त केले आहे. त्यामुळे स्वाभाविक भोपळ्याला मागणी वाढली आहे.

Web Title: Tomorrow's production of pumpkin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी