उद्या मविप्रची सहावी मॅरेथॉन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 01:52 AM2019-01-05T01:52:14+5:302019-01-05T01:52:42+5:30

जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेतर्फे सहाव्या राष्ट्रीय व अकराव्या राज्यस्तरीय मविप्र मॅरेथॉन स्पर्धेची सर्व तयारी पूर्ण झाली असून, यावर्षी ही स्पर्धा ६ जानेवारीला होणार नियमित वेळेच्या काही वेळ आधीच सुरू होणार असल्याची माहिती संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी शुक्रवारी (दि.४) संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयातील पत्रकार परिषदेत दिली.

Tomorrow's Sixth Marathon of MVP | उद्या मविप्रची सहावी मॅरेथॉन

‘मविप्र मॅरेथॉन २०१९’च्या स्मृतिचिन्हाचे अनावरण करताना मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार, डॉ. सुनील ढिकले, नाना महाले, सचिन पिंगळे यांच्यासह प्रा. हेमंत पाटील, डॉ. जे. डी. सोनखासकर, डॉ.मीनाक्षी गवळी आदी.

Next
ठळक मुद्देतयारी पूर्ण : तीन हजार धावपटूंचा सहभाग

नाशिक : जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेतर्फे सहाव्या राष्ट्रीय व अकराव्या राज्यस्तरीय मविप्र मॅरेथॉन स्पर्धेची सर्व तयारी पूर्ण झाली असून, यावर्षी ही स्पर्धा ६ जानेवारीला होणार नियमित वेळेच्या काही वेळ आधीच सुरू होणार असल्याची माहिती संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी शुक्रवारी (दि.४) संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयातील पत्रकार परिषदेत दिली.
नीलिमा पवार यांनी मविप्र मॅरेथॉन स्पर्धेचा प्रवास सांगताना मॅरेथॉन तयारी पूर्ण झाली असून, स्पर्धेचा धावनमार्ग, रिफ्रेशमेंट व स्पंजिंग पॉर्इंट,वैद्यकीय सुविधा, स्पर्धेसाठी असलेले गट, खेळाडूंची निवासाची, भोजनाची व्यवस्था याविषयी माहिती दिली. या स्पर्धेसाठी एकूण ७ लाख २३ हजार रुपयांची रोख बक्षिसे देण्यात येणार असून, स्पर्धेसाठी भारतीय अ‍ॅथलेटिक्स संघटना तसेच महाराष्ट्र अ‍ॅथलेटिक्स संघटना व नाशिक जिल्हा अ‍ॅथलेटिक्स संघटना यांची मान्यता मिळालेली असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. स्पर्धेसाठी अखिल भारतीय अ‍ॅथलेटिक्स संघटनेच्या वतीने राष्ट्रीय निरीक्षक जी.कृष्णन व महाराष्ट्र अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे आर. जोशी हे निरीक्षक म्हणून काम पाहतील, असे नियोजन समितीतर्फे सांगण्यात आले. दरम्यान, मविप्र मॅरेथॉन २०१९च्या स्मृतिचिन्हाचेही यावेळी अनावरण करण्यात आले. यावेळी चिटणीस डॉ. सुनील ढिकले, संचालक नाना महाले, सचिन पिंगळे, शिक्षणाधिकारी प्रा. एस. के. शिंदे, सी. डी. शिंदे, डी. डी. काजळे, क्रीडाधिकारी प्रा. हेमंत पाटील, प्राचार्य डॉ. जे. डी. सोनखासकर, डॉ.मीनाक्षी गवळी आदी उपस्थित होते.

ललिता बाबर दाखवणार हिरवा झेंडा
मॅरेथॉन स्पर्धेसाठी आतापर्यंत तीन हजार धावपटूंनी रजिस्ट्रेशन केलेले असून, यावर्षी मागील स्पर्धेची रेकॉर्ड ब्रेक होऊन नवीन विक्रमाची नोंद होईल, अशी आशा आयोजन समितीतर्फे व्यक्त करण्यात आली आहे. तसेच स्पर्धेची सुरुवात ही रिओ आॅलिम्पिकमध्ये ३००० मीटर स्टीपलचेस प्रकारात अंतिम फेरीत धडक मारणारी महाराष्ट्राची धावपटू ललिता बाबर यांच्या व संस्थेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत होणार आहे.
रविवारी वाहतूकमार्गात बदल
मराठा विद्या प्रसारक समाजातर्फे गंगापूररोडवरील मॅरेथॉन चौक ते धोंडेगाव या मार्गावर रविवारी (दि़६) मविप्र मॅरेथॉन-२०१९ होणार आहे़ या मार्गावर वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी रविवारी या मार्गावरील वाहतूक मार्गात बदल केल्याची अधिसूचना पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांनी प्रसिद्धीस दिली आहे़
४गंगापूररोडवरील आयुक्तालय हद्द ते मॅरेथॉन चौकापर्यंतचा मार्ग रविवारी पहाटे ५ ते दुपारी १२ या कालावधीत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद असणार आहे़ या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक ही गंगापूररोडवरील रस्तादुभाजकाच्या दुसऱ्या बाजूने (अशोकस्तंभ ते आयुक्तालय हद्द) या मार्गावर सुरू राहणार आहे़

Web Title: Tomorrow's Sixth Marathon of MVP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.