कांदा बियाणांसाठी टोंगळ्यांच्या पिकाला पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 01:25 IST2021-04-21T01:24:36+5:302021-04-21T01:25:36+5:30
परिसरात मागील वर्षी काद्यांचे बियाणे फसवे निघाल्याने यंदा शेतकऱ्यांनी आपल्याच शेतात भरघोस उत्पन्न मिळण्यासाठी जीवापाड प्रयत्न करून ऐन उन्हाळ्यात टोंगळ्यांचे क्षेत्र वाढवून पाणी देत असल्याचे दिसून येते. वाफ्यांमध्ये सतत पाणी साचल्याने मधमाशांचे प्रमाण वाढवून टोंगळ्यांवरती मधमाशा बसून चांगल्याप्रकारे बियावर फुली पडून बहर आलेला आहे.

पिंपळगाव लेप येथील शेतकऱ्यांचे बहरलेले टोंगळ्यांचे पीक.
पिंपळगाव लेप : येथील परिसरात मागील वर्षी काद्यांचे बियाणे फसवे निघाल्याने यंदा शेतकऱ्यांनी आपल्याच शेतात भरघोस उत्पन्न मिळण्यासाठी जीवापाड प्रयत्न करून ऐन उन्हाळ्यात टोंगळ्यांचे क्षेत्र वाढवून पाणी देत असल्याचे दिसून येते. वाफ्यांमध्ये सतत पाणी साचल्याने मधमाशांचे प्रमाण वाढवून टोंगळ्यांवरती मधमाशा बसून चांगल्याप्रकारे बियावर फुली पडून बहर आलेला आहे. बी भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत होत असल्याने मधमाशीमुळे टोंगळ्यातील बी सहज भरून निघते. त्यामुळे शेतकऱ्यांना कांद्याचे बी मिळणे अवघड होत नाही.
दोन वर्षांपासून कांदा लागवडीसाठी बियाणे वेळेवर मिळत नाही. दहा ते पंधरा हजार रूपये किंमत प्रमाणे १ पायली बियाणे दुकानावरून किंवा खाजगी ठिकाणी खरेदी करावे लागते. त्यातही भेसळ बी घेऊन शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे पिंपळगाव लेप परिसरात सातारे, शेवगे, धुळगांव, जऊळके, मानोरी, जळगाव नेऊर या भागातील शेतकऱ्यांनी यावर्षी मोठ्या प्रमाणात टोंगळ्यांची देखभाल करून क्षेत्र वाढल्याचे दिसून येत आहे.