पाटोळे ग्रामपंचायतीत ग्रामविकास पॅनलची सरशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:14 AM2021-01-21T04:14:10+5:302021-01-21T04:14:10+5:30

तीन प्रभागांत ९ जागांसाठी दोन गटांत समोरासमोर लढत झाली. प्रभाग एकमधून ग्रामविकास पॅनलचे तिन्ही उमेदवार विजयी झाले. मनोहर शंकर ...

Top of Gram Vikas Panel in Patole Gram Panchayat | पाटोळे ग्रामपंचायतीत ग्रामविकास पॅनलची सरशी

पाटोळे ग्रामपंचायतीत ग्रामविकास पॅनलची सरशी

Next

तीन प्रभागांत ९ जागांसाठी दोन गटांत समोरासमोर लढत झाली. प्रभाग एकमधून ग्रामविकास पॅनलचे तिन्ही उमेदवार विजयी झाले. मनोहर शंकर चकोर (४०८), संगीता हंसराज आव्हाड (३९०), गीतांजली सोमनाथ कराड (३८७) यांचा विजय झाला, तर विरोधी पॅनलचे सूर्यभान काशिनाथ खताळे (१०५),

शीला मधुकर चकोर (११८), सरला बाजीराव खताळे (१२४) यांचा मोठ्या मतांनी पराभव झाला. प्रभाग दोनमध्ये ग्रामविकास पॅनलनची सरशी झाली. सुनील सावळीराम सांगळे (४४२), जिजा ज्ञानेश्वर खताळे (३९९), देवीदास रामनाथ कराड (३९१) यांनी अनुक्रमे भाऊसाहेब पुंजा सांगळे (१७२), बेबी ज्ञानेश्वर खताळे (२१५), गणपत शिवराम कराड (२२३) यांचा पराभव केला. प्रभाग तीनमध्ये भाऊपाटील तुकाराम खताळे (२९४), मनीषा शिवराम खताळे (३०६) यांनी शिवाजी वाळिबा खताळे (२८७) व सुवर्णा अरुण साळवे (२६४) यांचा पराभव केला, तर ग्रामविकास पॅनलच्या मोहिनी गणेश खताळे व विरोधी पॅनलच्या आशा राजेंद्र खताळे यांना समसमान २९९ मते मिळाल्याने चिठ्ठी पद्धतीने निर्णय घेण्यात आला. यामध्ये ग्रामविकासच्या मोहिनी खताळे यांना नशिबाने साथ दिल्याने त्यांच्या नावाची चिठ्ठी निघाल्याने विजयी घोषित करण्यात आले.

--------------

सिन्नर तालुक्यातील पाटोळे ग्रामपंचायतीत ग्रामविकास पॅनलने सरशी केल्याने आनंदोत्सव साजरा करताना माजी सरपंच मेघराज आव्हाड व कार्यकर्ते. (२० पाटोळे)

===Photopath===

200121\20nsk_17_20012021_13.jpg

===Caption===

२० पाटोळे

Web Title: Top of Gram Vikas Panel in Patole Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.