पिण्याच्या पाण्यास सर्वोच्च प्राधान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 12:31 AM2018-10-16T00:31:40+5:302018-10-16T00:41:10+5:30
सटाणा : कमी पावसामुळे परिस्थिती गंभीर बनल्याने देवळा आणि बागलाण तालुक्यातील बऱ्याच भागातील जनतेला पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल तसेच दुष्काळ निवारणासाठी लवकरच उपाययोजना करण्यात येणार असल्याची ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी या तालुक्यांतील दुष्काळी भागाची पाहणी केल्यानंतर आयोजित आढावा बैठकीत बोलताना दिली. दरम्यान, गिरीश महाजन यांचा ताफा सटाणा शहरात येताच युवक काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी केली. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.
सटाणा येथे पालकमंत्री गिरीश महाजन यांना काळे झेंडे दाखविणारे कॉँग्रेस, राष्टÑवादीचे कार्यकर्ते.
सटाणा : कमी पावसामुळे परिस्थिती गंभीर बनल्याने देवळा आणि बागलाण तालुक्यातील बऱ्याच भागातील जनतेला पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल तसेच दुष्काळ निवारणासाठी लवकरच उपाययोजना करण्यात येणार असल्याची ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी या तालुक्यांतील दुष्काळी भागाची पाहणी केल्यानंतर आयोजित आढावा बैठकीत बोलताना दिली. दरम्यान, गिरीश महाजन यांचा ताफा सटाणा शहरात येताच युवक काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी केली. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.
पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी (दि.१५) बागलाण, देवळा तालुक्यातील दुष्काळी भागांची पाहणी केली. त्यानंतर बागलाण व देवळा तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी येथील पंचायत समितीत सर्व खातेप्रमुख, अधिकारी व लोकप्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी महाजन बोलत होते. नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांची पाहणी करून आगामी आठ दिवसांत माहिती सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिले आहेत. राज्य सरकार दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, पिकांची अवस्था अत्यंत वाईट आहे. पेरणीपुरता पाऊस झाला मात्र त्यानंतर पावसाने पाठ फिरवल्याने बळीराजावर मोठे संकट आले आहे. रोज पाण्याच्या टॅँकरची मागणी वाढत असल्याचे धक्कादायक चित्र असले तरीही दुष्काळावर मात करण्यासाठी आणि शेतकºयांना शक्य तेवढी मदत करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार कटिबद्ध असल्याचेही महाजन यांनी सांगितले. दरम्यान, हरणबारी डाव्या कालव्याचे काम आठवडाभरात सुरू होणार असून तळवाडे-भामेर एक्स्प्रेस कालवा पूर्णत्वाच्या मार्गावर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तत्पूर्वी देवळा-चांदवड मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल आहेर, बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण, डॉ. विलास बच्छाव, मनोहर देवरे, दिलीप अहिरे यांनी दुष्काळाची दाहकता लक्षात आणून देत शेतकºयांना दिलासा देण्याची मागणी केली.
नदीजोड प्रकल्प प्रमुख ध्येय
राज्यात नदीजोड प्रकल्प राबविण्यासाठी केंद्र व राज्य सरकार कटिबद्ध असून, या महत्त्वपूर्ण कामासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच ३० हजार कोटी रु पयांच्या खर्चाला मंजुरी दिली आहे. लवकरच हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. आगामी सहा महिन्यांच्या आत या कामाला सुरु वात करणार असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले. विरोधी पक्षांकडून घोषणाबाजी पालकमंत्री गिरीश महाजन यांचा ताफा सटाणा शहरात येताच युवक कॉँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी केली. बीजेपी सरकार हाय हाय, महाराष्ट्र दुष्काळी जाहीर झालाच पाहिजे, पेट्रोल, डिझेल जीएसटी कक्षेत आला पाहिजे, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. राज्यात भाजपची सत्ता येऊन चार वर्षे झाले तरी प्रथमच बागलाण तालुका दौºयावर पालकमंत्री आले म्हणून त्यांचा निषेध व्यक्त करण्यात आल्याचे राष्ट्रवादीचे नगरसेवक काकाजी सोनवणे यांनी सांगितले. दरम्यान, सटाणा पोलिसांनी नाशिक जिल्हा युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक राहुल पाटील, राष्ट्रवादीचे गटनेते तथा नगरसेवक काका सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष नितीन सोनवणे, काँग्रेस शहराध्यक्ष किशोर कदम, प्रसाद ऊर्फ चिक्या छाजेड यांना अटक केली. काही वेळाने त्यांना सोडून देण्यात आले.