राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मशाल रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 11:06 PM2021-08-29T23:06:28+5:302021-08-29T23:07:59+5:30
पिंपळगाव बसवंत : भारतीय हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद सिंह यांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा करण्यात येतो त्या निमित्ताने खुल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या.
पिंपळगाव बसवंत : भारतीय हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद सिंह यांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा करण्यात येतो त्या निमित्ताने खुल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या.
पिंपळगाव हायस्कूल येथे रविवारी (दि.२९) सकाळी ९ वाजता कुस्तीपटू रवींद्र मोरे यांच्या हस्ते निफाड फाटा परिसरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून मशाल रॅली काढण्यात आली आणि मेजर ध्यानचंद अमर रहेच्या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, संजय पाटील, अनिल जाधव, पिंपळगावचे सहायक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे, एनसीसी अधिकारी नितीन डोखळे, क्रीडाशिक्षक रामराव बनकर आदी मान्यवर तर पिंपळगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक अशोक मोरे हे अध्यक्षस्थानी होते.
गेल्या दोन-अडीच वर्षांपासून खेळाडू व शाळेतील विद्यार्थी मैदानी खेळापासून दुरावले आहेत; मात्र या मुलांची ओढ मैदानी खेळाकडे टिकून राहावी आणि क्रीडा संस्कृती वाढावी, त्यांना प्रोत्साहन मिळावे तसेच कानाकोपऱ्यात खेळाची जागरुकता निर्माण व्हावी यासाठी पिंपळगावी राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा करण्यात आला.
या जिल्हा खुल्या स्पर्धेत ८० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. त्यात म्युझिकल चेअर व स्केटिंग चेअर स्पर्धेत ८ वर्षांखालील मुलींच्या गटात आरुषी भोसले-प्रथम, स्नेहल गणेश शेवरे-द्वितीय, स्वराली गोसावी-तृतीय. तर मुलांच्या गटात वेदांत डेरे-प्रथम, बजीवन जाधव-द्वितीय,अभिषेक डेरे-तृतीय विजेते ठरले.
१७ वर्षांखाली मुले गटात विनायक जाधव-प्रथम, आर्यन मोरे-द्वितीय, स्वरूप आथरे-तृतीय, मुली गटात खुशी इखांकर-प्रथम, लेण्याद्री आहिरराव-द्वितीय, अदिती वणवे-तृतीय.
१८ वर्षांपुढील मुले गटात शुभम जाधव-प्रथम, ऋषिकेश उगले-द्वितीय, मुली गटात तेजश्री निकम-प्रथम, नम्रता खैरनार-द्वितीय, शुभाश्री आढाव-तृतीय.
१४ वर्षांखालील मुलांमध्ये आरुष भोसले-प्रथम, साईल वनसे-द्वितीय, हेमंत सैदाने-तृतीय, मुलींमध्ये अनवी कोकाटे-प्रथम, पालख देवरे-द्वितीय, खुशी बोरसे-तृतीय.
१४ वर्षांपुढील मुले गटात यश लभडे-प्रथम, धृप भागवत-द्वितीय, सिदेश आहिरे-तृतीय, मुलींच्या गटात स्वराली गोसावी आदी विद्यार्थ्यांनी पारितोषिके मिळविली. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
स्पर्धा यशस्वीतेसाठी क्रीडा भारती नाशिक व क्रीडा भारती निफाड, निफाड तालुका एज्युकेशन सोसायटी पिंपळगाव हायस्कुल, मास्टर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ऑफ मार्शल आर्टचे प्रशिक्षक योगेश जठार, योगेश देशमुख, मोसीम मणियार, अमोल पवार, सचिन सूर्यवंशी यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन मोते यांनी तर आभार क्रीडाशिक्षक अमोल पवार यांनी मानले.