पेठ तालुक्यात मुसळधार; जनजीवन विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:15 AM2021-09-23T04:15:51+5:302021-09-23T04:15:51+5:30

संततधार पावसाने नद्या-नाल्यांना पूर आल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. अनेक फरशी पुलावरून पाणी वाहत असल्याने गावांचा संपर्क तुटला. ...

Torrential downpour in Peth taluka; Disrupted public life | पेठ तालुक्यात मुसळधार; जनजीवन विस्कळीत

पेठ तालुक्यात मुसळधार; जनजीवन विस्कळीत

googlenewsNext

संततधार पावसाने नद्या-नाल्यांना पूर आल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. अनेक फरशी पुलावरून पाणी वाहत असल्याने गावांचा संपर्क तुटला. बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत असल्याने व्यावसायिकांनी सकाळपासूनच दुकाने बंद ठेवणे पसंत केले. तालुक्यातील छोटेमोठे धरणे पूर्ण क्षमतेने भरली असून नद्यांमधून विसर्ग होत आहे.

--------------------------

सावळघाटात ट्रक-पिकअप धडकली

बुधवारी सकाळपासून संततधार पाऊस व प्रचंड धुके असल्याने सावळघाटात एका वळणावर ट्रेलर व पिकअपचा अपघात झाला. यामध्ये पिकअप रस्त्याच्या कडेला जवळपास ५० फूट घसरत गेली. तर ट्रेलर रस्त्यावर आडवा झाल्याने संततधार पावसात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली.

----------------------------------

1) पेठ तालुक्यात संततधार पावसाने नद्यांना आलेला पूर.

2) सावळघाटात कंटेनर व पिकअपच्या अपघातात वाहनांचे झालेले नुकसान. (२२ पेठ रेन १/२)

220921\22nsk_6_22092021_13.jpg~220921\22nsk_7_22092021_13.jpg

२२ पेठ रेन १~२२ पेठ रेन २

Web Title: Torrential downpour in Peth taluka; Disrupted public life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.