इगतपुरी तालुक्यात मुसळधार पाऊस सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 05:56 PM2019-08-04T17:56:17+5:302019-08-04T17:56:23+5:30

भास्कर सोनवणे । लोकमत न्यूज नेटवर्क घोटी : इगतपुरी तालुक्यात मुसळधार पाऊस सुरूच आहे. पावसाने वार्षिक सरासरी गाठली आहे. सरासरीपेक्षा कितीतरी जास्त पाऊस ह्यावर्षी नोंदवला जाणार आहे. धरणे, नद्या, नाले, सपाट जमिनी, घोटी इगतपुरी शहरातील रस्त्यांवर प्रचंड पाणी साठल्याने पुरजन्य स्थिती झाली आहे.

 The torrential rains continue in Igatpuri taluka | इगतपुरी तालुक्यात मुसळधार पाऊस सुरूच

इगतपुरी तालुक्यात मुसळधार पाऊस सुरूच

Next
ठळक मुद्दे शेनीत, अस्वली, आडवण, गोंदे दुमाला आदी भागातील पुलावरून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत असल्याने काही तासांपासून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अनेक गावे पाण्याने वेढली गेली आहेत. आपत्कालीन यंत्रणा कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सज्ज असल्याची माहिती प

भास्कर सोनवणे । लोकमत न्यूज नेटवर्क
घोटी : इगतपुरी तालुक्यात मुसळधार पाऊस सुरूच आहे. पावसाने वार्षिक सरासरी गाठली आहे. सरासरीपेक्षा कितीतरी जास्त पाऊस ह्यावर्षी नोंदवला जाणार आहे. धरणे, नद्या, नाले, सपाट जमिनी, घोटी इगतपुरी शहरातील रस्त्यांवर प्रचंड पाणी साठल्याने पुरजन्य स्थिती झाली आहे. नद्या आणि धरणांनी धोक्याची पातळी गाठली आहे. तालुक्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंढेगावजवळ महामार्गावर ५ फूट पाणी साचले आहे.
वाडीवº्हे, घोटी, इगतपुरी पोलीस ठाण्याकडून कार्यक्षेत्रात विशेष लक्ष घालण्यात येत असून पाण्याच्या प्रवाहाकडे जाणाऱ्या नागरिक आणि पर्यटकांना अडवण्यात आले आहे. पंचायत समिती, आरोग्य, कृषी, बांधकाम आदी यंत्रणेच्या अधिकाº्यांना मुख्यालयी राहण्याच्या सूचना देण्यात आल आहे. दरम्यान भात आणि जमिनीच नुकसान झाले आहे. महसूल यंत्रणेने नुकसानीचे पंचनामे करून कार्यवाही सुरू करावी अशी मागणी होत आहे. नदीकाठच्या गावातील आणि सखल भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे कळवण्यात आले आहे.
पावसामुळे घोटी बाजारपेठेत शुकशुकाट असून अनेक व्यापार्यांच्या गाळ्यात पाणी शिरले आहे. उतारावरील घरांमध्ये पाण्याचा लोंढा घुसत आहे. पाणी जाण्यासाठी जागा कमी पडते आहे. रिक्षा आण िखासगी वाहतूक सेवा कोलमडली आहे. अस्वली ते मुंढेगावला जोडणारा पूल, शेनीत ते भगूर पूल, आडवण ते घोटी पूल, पिंप्री सद्रोद्दीन पूल, टाकेद बुद्रुक भागातील काही पूल, गोंदे दुमाला गावाला जोडणारा पूल, बेलगाव कुर्हे पूल, पाडळी ते जानोरी रेल्वे पुलांवरून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत आहे. त्यामुळे ह्या गावांचा संपर्क तुटला आहे.
जनजीवन विस्कळीत असून अनेक मार्गावर पाणी आले आहे. लोकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे. इगतपुरी शहराला पाण्याचा वेढा पडला असून घरांमध्ये पाणी घुसले आहे. अति पावसामुळे मुंबई कडून इगतपुरी कडे येणारी-जाणारी सर्व रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली असून रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे बº्याच गाड्या इगतपुरी व इगतपुरीच्या पहिल्या स्टेशनांवर थांबविण्यात आल्या आहेत.
गोंदे दुमाला येथे पुलावर प्रचंड पाणी आल्याने सरपंच गणपत जाधव, सरपंच शरद सोनवणे, ग्रामपंचायत ग्रामसेवक सुरेश भोजणे, सुनील नाठे आदींनी मदतकार्य सुरू केले आहे. दोन्ही बाजूंनी वाहतूक बंद करून दोर लावले आहेत.

Web Title:  The torrential rains continue in Igatpuri taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.