इकडे छळवणूक, तिकडे हप्तावसुली
By विजय मोरे | Published: November 17, 2018 01:09 AM2018-11-17T01:09:35+5:302018-11-17T01:10:25+5:30
पेशाने शिक्षक, मूळचा पालघर जिल्ह्णातील मोखाडा तालुक्यातील रहिवासी, गत चार वर्षांपासून विनावेतन विद्यादानाचे कार्य करणारा़ दिवाळीनिमित्त सासूरवाडीला गेल्यानंतर तिथे सासऱ्यांच्या हॉटेलवर पोलिसांकडून सुरू असलेली हप्ता-वसुली त्याच्या शिक्षकी मनाला रुजली नाही़ त्याने या हप्ता वसुलीचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करून ते सोशल मीडियावर व्हायरल केले अन् पोलिसांचा चेहरा समोर आणला़ मात्र, भ्रष्टाचारा-विरोधात लढणाºया या शिक्षकावर पोलिसांबाबत तक्रार करतो या कारणावरून त्र्यंबकेश्वर पोलिसांनी छळवणूक केलीच आता एकीकडे पोलीस अन् दुसरीकडे हप्तावसुली करणारे गुंड यांच्या कात्रीत या शिक्षकाचे कुटुंबीय सापडले असून, पीडित शिक्षकाने विशेष पोलीस महानिरीक्षकांना निवदेन दिले आहे़
नाशिक : पेशाने शिक्षक, मूळचा पालघर जिल्ह्णातील मोखाडा तालुक्यातील रहिवासी, गत चार वर्षांपासून विनावेतन विद्यादानाचे कार्य करणारा़ दिवाळीनिमित्त सासूरवाडीला गेल्यानंतर तिथे सासऱ्यांच्या हॉटेलवर पोलिसांकडून सुरू असलेली हप्ता-वसुली त्याच्या शिक्षकी मनाला रुजली नाही़ त्याने या हप्ता वसुलीचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करून ते सोशल मीडियावर व्हायरल केले अन् पोलिसांचा चेहरा समोर आणला़ मात्र, भ्रष्टाचारा-विरोधात लढणाºया या शिक्षकावर पोलिसांबाबत तक्रार करतो या कारणावरून त्र्यंबकेश्वर पोलिसांनी छळवणूक केलीच आता एकीकडे पोलीस अन् दुसरीकडे हप्तावसुली करणारे गुंड यांच्या कात्रीत या शिक्षकाचे कुटुंबीय सापडले असून, पीडित शिक्षकाने विशेष पोलीस महानिरीक्षकांना निवदेन दिले आहे़
संत आईसाहेब महाराज इंग्लिश स्कूल, पळसे येथील शिक्षक गणेश गोंदके यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांवर हप्तेखोर पोलीस कर्मचारी व अधिकाºयांमुळे ही कठीण वेळ आली आहे़ गोंदके यांचा दोष इतकाच की त्यांना भ्रष्टाचार बघविला गेला नाही आणि त्यांनी त्याचा जिवंत पुरावा तयार करून वरिष्ठ पोलीस अधिकाºयांच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी तसेच दोषींना शिक्षा व्हावी यासाठी तो सोशल मीडियावर व्हायरल केला़ त्यांनी केवळ पोलिसांचेच नाही तर राज्य उत्पादन शुल्क विभागाचेही पुरावे जमा केले आहेत़ या पुराव्यांमुळेच उत्पादन शुल्कच्या निरीक्षकाने त्यांच्या सासूबार्इंना मारहाण करण्यात केली़ या मारहाणीची तक्रार त्यांनी त्र्यंबकेश्वर पोलिसांत दोनवेळा दिली़
पोलीस उपअधीक्षकाच्या नावाने हप्तावसुली करणाºया विलास पाटील या कर्मचाºयाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकाºयाच्या वाहनावरील कर्मचारी वायकांडेचाही व्हिडीओ व्हायरल केला़ यानंतर सासºयांसोबत संबंधित पोलीस कर्मचाºयावर गुन्हा दाखल व्हावा यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे जाऊन पुरावेही दिले़ यानंतर सासूच्या मारहाणीबाबत दिलेल्या तक्रारीवरील कारवाईबाबत चौकशी करण्यासाठी गेलेल्या शिक्षक गोंदके याच्यावर त्र्यंबकेश्वर पोलिसांनी धमकावणीची भाषा वापरून पोलिसाची तक्रार करतो का? तुला दाखवितोच पोलीस काय असतो असे म्हणून तब्बल पाच तास डांबून ठेवत छळ केला़, असे पीडिताने नमूद केले आहे. सोशल मीडियावर गोंदके यांनी व्हिडीओ व्हायरल केल्याची माहिती मिळाल्यानंतर संबंधित हप्तेखोर पोलीस कर्मचारी व अधिकाºयांचे धाबे दणाणले़ त्यांनी गुंड तसेच पोलीस बळाचा वापर करून धमकावण्याचा प्रकार सुरू केला आहे़ यामुळे गोंदके यांची पत्नी व लहान मुलाला अक्षरश: भूमिगत करावे लागले आहे़ विशेष म्हणजे पोलिसांनी तू शिकविण्याचे काम कर, तुला कायदा कळत नाही आम्ही दाखवतो तुला कायदा काय असतो ते असे म्हणून त्र्यंबकेश्वरचे एपीआय बेंडाळे याने वरिष्ठांना फोन लावून मानसिक त्रास दिला़ तसेच नोकरी घालविण्याची धमकीही दिल्याचे निवेदनात म्हटले आहे.