महापालिकेचे १६ कर्मचारी बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 07:19 PM2020-06-24T19:19:37+5:302020-06-24T19:22:55+5:30
नाशिक : कोरोनाच्या विरोधात लढणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना आता संसर्ग वाढू लागला आहे. आत्तापर्यंत सोळा कर्मचारी बाधित झाले असून, स्मार्ट सिटी कंपनीच्या एका चतुर्थश्रेणी कर्मचाºयाचा मृत्यू झाला आहे. बाधितांमध्ये वैद्यकीय विभागाच्या दहा कर्मचाºयांचा समावेश आहे. आयुक्तांच्या कार्यालयातील एका कर्मचाºयाला संसर्ग झाल्याचे आढळून आले असले तरी आयुक्त राधाकृष्ण गमे मात्र, कामावर हजर आहेत. याशिवाय महापालिकेचा एक विभाग सील करण्यात आला आहे. बाकी कामकाज सुरळीत आहे.

कोरोनाविरोधातील लढ्यात सध्या महापालिकेचा वैद्यकीय विभाग महत्त्वाची भूमिका बजावत आहे. मात्र, दिवसेंदिवस कर्मचाºयांना संसर्ग वाढत आहे. महापालिकेच्या कोरोना रुग्णालयातील जवळपास दहा कर्मचाºयांना कोरोनाचा संसर्ग असल्याचे स्पष्ट झाले आहे, तर तीन चालकांना आणि अन्य तीन कर्मचारीदेखील कोरोनाबाधित असल्याचे आढळले आहे. यात महापालिकेच्या नगररचना विभागातील एका शिपायाला लागण झाल्यानंतर हा विभाग सील करण्यात आला, तर आयुक्तांच्या कार्यालयातील एका कर्मचाºयाला लागण झाल्यानंतर आयुक्तांचे सभागृह सील करण्यात आले आहे. विधि विभागाच्या एका कर्मचाºयालादेखील संसर्ग झाल्याचे बुधवारी (दि.२४) उघड झाले. त्याचप्रमाणे पंचवटीतील स्मार्ट सिटी कार्यालयातील एका चतुर्थश्रेणी कर्मचाºयाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. महापालिकेचे संपूर्ण मुख्यालयच सील करण्यात येणार असल्याची चर्चा असली तरी प्रत्यक्षात मात्र आयुक्त गमे यांनी इन्कार केला आहे. केवळ नगररचना विभागातील शिपायाला लागण झाल्याने हा विभाग सील करण्यात आला आहे. अन्य सर्व विभाग सुरू ठेवण्यात आले आहेत. याशिवाय मुख्यालयाच्या इमारतीचा पूर्र्वेकडील दरवाजा बंद ठेवण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.