वर्षभरात डेंग्यूचे तब्बल ८०१ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2019 02:00 AM2019-12-03T02:00:28+5:302019-12-03T02:00:47+5:30

शहरात यंदा पावसाळा लांबला, त्यानंतर परतीच्या पाऊसदेखील नोव्हेंबर महिन्यापर्यंत लांबल्यामुळे डेंग्यू कायम असून, गेल्या नोव्हेंबर महिन्यात ३२२ डेंग्यू रुग्ण आढळले आहेत. तर जानेवारीपासून आत्तापर्यंत महापालिकेच्या वतीने एकीकडे स्वच्छ शहर मोहीम राबविली जात असताना दुसरीकडे मात्र रोगराई थांबत नसल्याचे दिसत आहे.

 A total of 3 dengue patients a year | वर्षभरात डेंग्यूचे तब्बल ८०१ रुग्ण

वर्षभरात डेंग्यूचे तब्बल ८०१ रुग्ण

Next

नाशिक : शहरात यंदा पावसाळा लांबला, त्यानंतर परतीच्या पाऊसदेखील नोव्हेंबर महिन्यापर्यंत लांबल्यामुळे डेंग्यू कायम असून, गेल्या नोव्हेंबर महिन्यात ३२२ डेंग्यू रुग्ण आढळले आहेत. तर जानेवारीपासून आत्तापर्यंत महापालिकेच्या वतीने एकीकडे स्वच्छ शहर मोहीम राबविली जात असताना दुसरीकडे मात्र रोगराई थांबत नसल्याचे दिसत आहे.
शहरात पावसाळ्यात डेंग्यू, मलेरियाची साथ येते. मात्र यंदा जून, जुलैत पावसाचे प्रमाण कमी असल्याने डेंग्यूचे रुग्ण मर्यादित होते. त्या तुलनेत गतवेळेच्या तुलनेत स्वाइन फ्लूचे प्रमाण अधिक होते. मात्र आॅगस्ट महिन्यापासून शहरासह जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या दीडशे टक्के पाऊस पडला.
इतकेच नव्हे तर दिवाळी संपल्यानंतरदेखील पाऊस सुरूच होता. त्यामुळे डेंग्यूची संख्या आॅगस्टनंतर वाढतच गेली. आता नुकत्याच संपलेल्या नोव्हेंबर महिन्यातदेखील ३२२ रुग्ण आढळले आहेत.
वर्षभरात डेंग्यू रुग्णांची संख्या आठशेवर
नाशिक शहरात सुरुवातीला डेंग्यू रुग्णांची संख्या कमी होती. मात्र आॅगस्टनंतर रुग्णांची संख्या वाढत गेली. यंदा १ जानेवारी ते ३० नोव्हेंबर दरम्यान ३ हजार ४४ संशयित रुग्ण आढळले. त्यातील ८०१ जणांना डेंग्यू झाल्याचे आढळले आहे. त्यामुळे रोगराईची तीव्रता लक्षात येते. याशिवाय महापालिकेकडे नोंद नसलेल्या परंतु खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्या यापेक्षा अधिक असल्याचेदेखील सांगण्यात येत आहे.

Web Title:  A total of 3 dengue patients a year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.