धड धड वाढते ठोक्यात...!

By admin | Published: February 20, 2017 12:42 AM2017-02-20T00:42:51+5:302017-02-20T00:43:16+5:30

धड धड वाढते ठोक्यात...!

Tough flare increases ...! | धड धड वाढते ठोक्यात...!

धड धड वाढते ठोक्यात...!

Next

नाशिक : महापालिकेच्या निवडणुकीसाठी काउंटडाउन सुरू झाले असून, अवघ्या काही तासांवर मतदान येऊन ठेपल्याने उमेदवारांची घालमेल वाढली आहे. निवडणूक प्रचारातील बरे-वाईट अनुभव गाठीशी ठेवून ऐनवेळी आपल्या पक्षाच्या उमेदवाराला सोडून विरोधी पक्षातील सबळ उमेदवारांना बरोबर घेऊन पॅनल चालविण्याचे अनेक प्रकार घडत आहेत. अखेरच्या टप्प्यात अशाप्रकारच्या नाट्यमय घडामोडींनी राजकीय वातावरण गाजत आहे. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक होत आहे. या आधी म्हणजे २००२ मध्ये तीन सदस्यीय पद्धती अस्तित्वात होती. त्यानंतर गेल्यावेळी द्विसदस्यीय प्रभाग  होते आणि आता थेट चार  सदस्यीय प्रभाग पद्धती अस्तित्वात आली आहे.  त्यामुळे कोणा एका उमेदवाराच्या भरवशावर निवडणूक लढविणे सोपे नाही, इतके मोठे भौगोलिक प्रभाग आहेत. चार भागातील चार प्रभाव टाकणारे उमेदवार मिळत नसल्याने एका माजी महापौरासह अनेकांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे. राजकीय पक्षांनी उमेदवारी देताना समतोल साधण्याचा प्रयत्न केला असला तरी संबंधित सर्वच उमेदवार सक्षम आहेत, अशी स्थिती नाही.  गेल्या आठ ते दहा दिवसांच्या प्रचारात सर्वच पक्षांतील उमेदवारांना आपल्या आणि आपल्याबरोबरच असलेल्या सहकारी उमेदवारांच्या ताकदीचा अंदाज आला आहे. त्यामुळे आता निवडणुकीच्या शेवटच्या क्षणी कमकुवत साथीदारांना सोडून जो तो आपल्या पद्धतीने खेळी करत असून प्रसंगी विरोधी पक्षांतील उमेदवार आणि आणि अपक्षांशी पॅनल तयार केले आहे. त्यामुळे उमेदवारांचा आपसातच रोष वाढू लागला
आहे. निवडणुकीत ज्या पक्षाचा उमेदवार सोयीचा त्याला बरोबर घेण्यामुळे राजकीय परिमाणे बदलणार आहेत.
महापालिका निवडणुकीत नाशिकमध्ये अशाप्रकारे ऐनवेळी विरोधी पक्षांच्या पॅनलमधील उमेदवाराला हाताशी घेण्याचे प्रकार नवीन नाहीत. गेल्या निवडणुकीत असे प्रकार घडले होते आणि निवडणुकीत पराभूत झालेल्या काही पक्षीय उमेदवारांनी त्यावर वाच्यताही केली होती, त्यामुळे निवडणुकीतील धुसफूस निकालानंतरच बाहेर पडण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Tough flare increases ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.