'तौक्ते'ने घेतला २५ झाडांचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:13 AM2021-05-24T04:13:37+5:302021-05-24T04:13:37+5:30
नाशिक : शहर व परिसरातील वातावरणावर 'तौक्ते' चक्रीवादळाचा प्रभाव सलग तीन ते चार दिवस पहावयास मिळाला होता. ताशी ...
नाशिक : शहर व परिसरातील वातावरणावर 'तौक्ते' चक्रीवादळाचा प्रभाव सलग तीन ते चार दिवस पहावयास मिळाला होता. ताशी सुमारे १८ ते २० किलोमीटर इतक्या वेगाने वादळी वारे वाहत होते. यामुळे गेल्या आठवड्यात सुमारे २५ झाडांचा बळी गेला.
गेल्या सोमवारी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत शहर व परिसरात सोसाट्याचा १८.३ किलोमीटर प्रतितास वेगाने वाहत होता. ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडण्याचे 'कॉल' अग्निशमन मुख्यालयाला येत होते. तसेच काही ठिकाणी झाडांच्या फांद्याही तुटल्या शहर व परिसरात सोमवारी एकूण दहा झाडे कोसळली होती. तसेच मंगळवारीसुद्धा दहा ते बारा झाडे शहरातील विविध उपनगरांमध्ये कोसळली. मागील वर्षी निसर्ग चक्रीवादळाचा वृक्षसंपदेला तडाखा बसला होता. तसेच त्यापूर्वी 'ओखी' चक्रीवादळामुळेही झाडांची किंबहुना पर्यावरणाची अशाचप्रकारे हानी झाली होती.
मागील आठवड्यात वादळी वाऱ्यामुळे शहरातील गंगापूररोड, सीबीएस, त्र्यंबकनाका, खडकाळी तसेच पंचवटीतील मालेगाव स्टँड हिरावाडी, कोणार्कनगर त्याचप्रमाणे नाशिकरोड भागातील जेलरोड, चेहेडी या भागात झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या.
कोरोनामुळे एकीकडे वृक्षारोपणाच्या मोहिमेला मागील दोन वर्षांपासून शहरासह जिल्ह्यात ब्रेक लागला आहे. शासकीय स्तरावर किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांकडून वृक्षारोपण केले जात नसून वृक्षसंवर्धनाचा मुद्दा बाजूला पडला आहे. अशातच चक्रीवादळामुळे दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर झाडे कोसळू लागली आहेत. तसेच पावसाळा सुरू झाला की त्या तीन महिन्यांतसुद्धा झाडे पडण्याच्या घटना या अधूनमधून घडतच असतात. नैसर्गिकरीत्या वृक्षांवर हे संकट दरवर्षी येते.
-----इन्फो---
'महावितरण'ची कुऱ्हाडही दरवर्षी कोसळते
पावसाळ्याच्या तोंडावर शहरातील उंच वाढलेल्या वृक्षांवर कोसळल्याशिवाय राहत नाही. अत्यंत निर्दयीपणे अशास्त्रीय पद्धतीने महावितरणच्या ठेकेदारांची माणसे झाडांवर छाटणीच्या नावाखाली घाव घालताना नजरेस पडत आहेत. वर्षानुवर्षे वीजतारा भूमिगत करण्याचा प्रश्न प्रलंबित ठेवला जात असून, त्याचा नाहक फटका झाडांच्या नैसर्गिक वाढीला बसत आहे. वीजतारांवर झाडांच्या फांद्या पडतात, ज्या भागात हा प्रश्न दरवर्षी उद्भवतो त्या भागात तरी प्राधान्याने वीजतारा भूमिगत केल्या तर पर्यावरणाचा ऱ्हासही थांबेल आणि वीजताराही सुरक्षित राहतील, असे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे.
-----
फोटो मागील आठवड्यात डेस्कॅन वर आहे, त्यापैकी वापरावे.