केंद्रीय आरोग्य समितीचा नाशिक जिल्ह्यात आढावा दौरा

By admin | Published: November 6, 2016 08:45 PM2016-11-06T20:45:22+5:302016-11-06T20:45:22+5:30

नाशिक जिल्ह्यातील आरोग्य सुविधांची माहिती जाणून घेण्यासाठी ‘सर्वसाधारण आढावा मोहिमे अंतर्गत’ विशेष केंद्रीय समिती रविवारी येथे दाखल झाली

Tourism review of Central Health Committee in Nashik district | केंद्रीय आरोग्य समितीचा नाशिक जिल्ह्यात आढावा दौरा

केंद्रीय आरोग्य समितीचा नाशिक जिल्ह्यात आढावा दौरा

Next
>ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 6 -  नाशिक  जिल्ह्यातील आरोग्य सुविधांची माहिती जाणून घेण्यासाठी ‘सर्वसाधारण आढावा मोहिमे अंतर्गत’ विशेष केंद्रीय समिती रविवारी  येथे दाखल झाली असून, समितीच्या सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत जिल्हा दौऱ्याच्या नियोजन केले.  तत्पुर्वी समितीने त्र्यंबकेश्वर येथे ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन येथील आरोग्य उपक्रेंद्राचीही पाहणी केल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सर डॉ. सुरेश जगदाळे यांनी दिली.  
केंद्रीय समितीकडून राज्यातील आरोग्य सेवेची माहिती घेण्यासाठी नाशिक व नागपूर जिल्ह्यातील आरोग्य सेवेचा प्राथमिक स्वरुपात आढावा घेण्यात येणार असून यात शहरी आरोग्य उपायुक्त डॉ. बसब गुप्ता, आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे अतिरिक्त महासंचालक  मेघा खोब्रागडे, एनव्हीबीडीसीपीचे संयुक्त संचालक डॉ. एस.एन शर्मा, राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या मनमयुरी, संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आंतरराष्ट्रीय विकास विभागाच्या डॉ.निता राव, जागतिक आयोग्य संस्थेच्या डॉ. सत्या लंका, संयुक्त राष्ट्र लोकसंख्या कोष कार्यक्रम अधिकारी डॉ. किर्ती अयंगार, एनआरयु विभागाच्या च्या डॉ. देवीना बाजपेयी यांचा समावेश आहे. हे पथक जिल्हयातील विविध शासकीय रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालयांसह  प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उफक्रेंद्रांची पाहणी करून सोयी सुविधांचा व आरोग्य सेवेचा आढावा घेणार आहे. केंद्रीय पथकाने या मोहीमेचा शुभारंभ रविवारी सकाळी त्र्यंबकेश्वर येथून केला. येथील शासकीय रुग्णालयाला या आठ सदस्यीय पथकाने माहिती दिली. मात्र याभेटीविषीय अधिकृतरीत्या पथकाने कोणतीही माहिती दिली नसून दौºयाच्या समारोप करताना बुधवारी अथवा गुरुवारी कें द्रीय पथक दौºयाविषयी सविस्त माहीत देणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक जगदाळे यांनी सांगितले. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयात केंद्रीय आढावा समीतीने चार दिवसाच्या जिल्हा दौºयाची अंतीम रुपरेषा निश्चित केली.  याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक सुरेश दगदाळे, आरोग्य उपसंचालक सुरेश पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाक्चौरे आदी उपस्थित होते.  पथकातील सदस्य रवीवारपासून गुरुवारपर्यंत जिल्ह्यातील विविध भागातील रुग्णालयांना भेट देऊन सोयी सुविधा आणि आरोग्य सेवेचा आढावा घेणार आहे. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयासह जिल्ह्यातील विविध उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णाल, संदर्भ सेवा रुग्णालयाला भेट देऊन आढावा घेतला असून पुढील तीन दिवसात जिल्ह्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील सोयी सुविधा आणि केंद्र शासनाच्या विविध योजनांचा व आरोग्य सुविधांचा आढावा केंद्रीय पथकाकडून घेतला जाणार आहे. 

Web Title: Tourism review of Central Health Committee in Nashik district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.