वैतरणा धरण परीसरात सुविधा अभाव येणाऱ्या पर्यटकांचा होतोय हिरमोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 05:46 PM2020-01-23T17:46:46+5:302020-01-23T17:47:41+5:30

वैतरणानगर : वैतरणा धरण परिसर पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. मात्र परिसरात पर्यटकांसाठी सोयीसुविधा नसल्याने येथे येणाºया पर्यटकांचा हिरमोड होत आहे. परिसरात सोयी सुविधा करण्याची मागणी परीसरातील नागरिक करत आहे.

Tourist arrivals in Vaitaran Dam area are lacking | वैतरणा धरण परीसरात सुविधा अभाव येणाऱ्या पर्यटकांचा होतोय हिरमोड

वैतरणा धरण परीसरात सुविधा अभाव येणाऱ्या पर्यटकांचा होतोय हिरमोड

Next
ठळक मुद्देपर्यटकांमध्ये नाराजीचा सुर निघत आहे.

लोकमत न्युज नेटवर्क
वैतरणानगर : वैतरणा धरण परिसर पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. मात्र परिसरात पर्यटकांसाठी सोयीसुविधा नसल्याने येथे येणाºया पर्यटकांचा हिरमोड होत आहे. परिसरात सोयी सुविधा करण्याची मागणी परीसरातील नागरिक करत आहे.
महाराष्ट्रातील नामवंत धरण म्हणुन वैतरणा धरण प्रसिद्ध आहे. याठिकाणी पर्यटनाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवुन दरवर्षी हजारो पर्यटक येथे भेट देत असतात. मात्र परीसरात पर्यटकांना आवश्यक सोयी सुविधा, प्रसाधन गृह, पर्यटनाचे दिशा दर्शक फलक नसल्याने येथे येणारे पर्यटकांमध्ये नाराजीचा सुर निघत आहे. यामुळे वैतरणा धरण परीसरात येणारे पर्यटकांमध्ये दिवसेंदिवस घट होत असल्याचे चित्र दिसत आहे.
१९६२ साली वैतरणा धरणासाठी जमिनी संपादीत करण्यात आल्या. १९७२ साली धरणाचे काम पुर्ण झाले. परंतु गेल्या पन्नास वर्षात संपुर्ण वैतरणा परीसरात कुठल्याही सोयी सुविधा करण्यात आलेल्या नाही. संपुर्ण महाराष्ट्रातील बहुतांशी धरण परीसरांचा योग्य तो विकास झाला आहे.
पर्यटकांसाठी सोयी सुविधा करण्यात आल्या आहेत. मात्र मुंबई महानगरपालिकेला पाणी पुरवठा करणाºया या महत्वाच्या अप्पर वैतरणा धरण परीसराचा विकास गेल्या पन्नास वर्षांपासुन आजतागायत झालेला नाही. मुबलक पाणीसाठा असल्याने वैतरणा परीसराचा विकास होणे गरजेचे असतांना हा परीसर आज पर्यत उपेक्षित राहिला आहे.
वैतरणा धरण परीसराला नैसिर्गक सौंदर्य भरभरून लाभलेले आहे. धरण, डोंगररांगा, जंगल आदी नैसर्गिक धनसंपदा लाभलेली आहे. या अनुषंगाने आजपर्यंत आपेक्षति सुधारणा झालेल्या नसल्याने पर्यटक या परीसरात येऊन नाराजी व्यक्त करतांना दिसत आहे.

वैतरणा धरण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे, मात्र येथे येणाºया पर्यटकांना योग्य सुविधा मिळत नसल्याने पर्यटकांचा हिरमोड होत असतो. परीसरात कुठेही प्रसाधान गृह नसल्याने महिलांची गैरसोय होत असते. धरण परीसरात ठिकठिकाणी प्रसाधन गृह उभारणे गरजेचे आहे.
- विष्णु पा. पोरजे,
जिल्हा उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस.

(फोटो २३ वैतरणा)
पर्यटकांना नेहमीच खुणावणारा वैतरणा धरण परीसर.

Web Title: Tourist arrivals in Vaitaran Dam area are lacking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.