ट्रॅव्हल एजंटच्या ठकबाजीचा फटका, मलेशियात अडकलेले नाशिकचे पर्यटक अखेर परतले

By संजय पाठक | Published: November 10, 2022 08:01 PM2022-11-10T20:01:04+5:302022-11-10T20:01:10+5:30

खासदार हेमंत गोडसे यांच्या पाठपुराव्यानंतर केंद्र शासनाची मध्यस्थी

Tourists from Nashik, stranded in Malaysia, hit by travel agent scams, finally return | ट्रॅव्हल एजंटच्या ठकबाजीचा फटका, मलेशियात अडकलेले नाशिकचे पर्यटक अखेर परतले

ट्रॅव्हल एजंटच्या ठकबाजीचा फटका, मलेशियात अडकलेले नाशिकचे पर्यटक अखेर परतले

googlenewsNext

नाशिक- ट्रॅव्हल्स एजंटच्या ठकबाजीमुळे मलेशियात अडकलेले  नाशिकचे पंधरा पर्यटक अखेरी नाशिकमध्ये सुखरूप परतले. नाशिकचे खासदर  हेमंत गोडसे यांच्या मध्यस्तीनंतर केंद्र शासनाच्या परराष्ट्र मंत्रालयाने मलेशिया एम्बेसी प्रशासनाशी पत्रव्यवहार करत मलेशिया पोलिसांच्या कस्टडीतून पंधरा पर्यटकांना सुखरूपपणे मायदेशी परत आणले.

नाशिकमधील सुभाष ओहोळे, मिनाक्षी ओहोळे, अरूण भदरंगे, शांताबाई भदरंगे,धनाजी जाधव,सुनिल म्हात्रे, संजीवनी म्हात्रे, अशोक भालेराव,विमल
भालेराव,मंदा गायकवाड,वृशाली गायकवाड,प्रविण नुमाळे,द्रोपदी जाधव,इंदूबाई रूपवते हे सर्व नाशिक  शहरातील एका ट्रॅव्हल्स कंपनीच्या एजंट मार्फत
मलेशिया येथे गेले होते.   हैदराबाद येथून चार जणांच्या विसाचे काम पूर्ण करून मलेशियाला येतो असे सांगून एजन्ट मलेशियात पोहोचलाच  नाही. त्यामुळे पर्यटक तेथे चिंतेत असतानाच  मलेशिया पोलिसांनी त्यांना हटकावले. आणि या सर्वांचे पासपोर्ट जप्त करून घेत त्यांना ताब्यात घेतले.

यासंदर्भात खासदार हेमंत गोडसे यांना नाशिकच्या पर्यटकांच्या नातेवाईकांकडून माहिती मिळाल्यानंतर,  खासदार गोडसे यांनी लगेचच केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना पत्र लिहून मलेशियात अडकलेल्या पर्यटकांची माहिती दिली. त्यांनी मलेशिया एम्बेसी प्रशासनाशी
या घटनेची माहिती कळवली.. त्यानंतर मलेशिया पोलिसांनी त्यांचे पासपोर्ट परत करून त्यांना हैदराबादसाठीच्या विमानात बसवून देत मायदेशी पाठविले. सर्व पर्यटक नाशिकला पोहचले.

Web Title: Tourists from Nashik, stranded in Malaysia, hit by travel agent scams, finally return

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक