पर्यटकांनी गजबजले नांदूरमधमेश्वर

By admin | Published: November 14, 2015 11:31 PM2015-11-14T23:31:59+5:302015-11-14T23:41:22+5:30

सुटीचे दिवस : परराज्यातील हौशी-अभ्यासू पक्षिप्रेमींचीही निरीक्षणासाठी हजेरी

Tourists gajabajale nanduramdhameshwar | पर्यटकांनी गजबजले नांदूरमधमेश्वर

पर्यटकांनी गजबजले नांदूरमधमेश्वर

Next

नाशिक : हिवाळ्याला झालेला प्रारंभ अन् चालू आठवड्यात दीपावलीनिमित्त आलेल्या सलग सुट्यांमुळे नागरिकांनी नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्याला भेट देण्याला अधिक पसंती देत आहे. नाशिकसह राज्यभरातून दोन दिवसांमध्ये पर्यटक नांदूरमधमेश्वरमध्ये दाखल होत आहे. यामुळे सकाळपासून संध्याकाळपर्यंत पक्षी अभयारण्यामधील निरीक्षण मनोऱ्यांवर हौशी-अभ्यासू पक्षिप्रेमींची झुंबड पहावयास मिळत आहे.
राष्ट्रीय अभयारण्याचा दर्जा प्राप्त झालेल्या निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर धरणाच्या पाणथळ जागेवर दरवर्षी हिवाळ्याची चाहूल लागताच शेकडो ते हजारो देशी व विदेशी स्थलांतरित पक्षी भूक भागविण्यासाठी येतात. सध्या नांदूरमधमेश्वरला वीस ते तीस प्रकारचे देशी-विदेशी पक्ष्यांचे थवे पहावयास मिळत आहे.
यामध्ये प्रामुख्याने पाणकोंबडी, बदक यांचा समावेश असून, थापट्या बदक, तरंग, भुवई बदक, चक्रवाक (ब्राह्मणी), गढवाल, तलवार बदक, नकटा बदक, जांभळा बगळा, राखाडी बगळा, लाल सरी बदक, हळदी-कुंक, मराल, टिबुकुली बदक, रंगीत करकोचा, उघड्या चोचीचा करकोचा, मोर शराटी, पांढरा शराटी, चमचा बगळा, मालगुजा, कमळ, दलदल ससाणा, टिबकेदार गरुड, कापसी ससाणा, सर्प गरुड यांसारख्या शिकारी पक्ष्यांचेही या ठिकाणी दर्शन घडते. त्यामुळे पर्यटक मोठ्या संख्येने हजेरी लावत
आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Tourists gajabajale nanduramdhameshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.