नव वर्षात नाशिकमध्ये पोहोचले पर्यटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:10 AM2021-01-01T04:10:38+5:302021-01-01T04:10:38+5:30

नाशिक: नवीन वर्षाचा आनंदोत्सव साजरा करण्याबरोबरच नाशिकमधील पर्यटन तसेच धार्मिक स्थळांवर पर्यटकांची गर्दी झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून ...

Tourists reach Nashik in New Year | नव वर्षात नाशिकमध्ये पोहोचले पर्यटक

नव वर्षात नाशिकमध्ये पोहोचले पर्यटक

Next

नाशिक: नवीन वर्षाचा आनंदोत्सव साजरा करण्याबरोबरच नाशिकमधील पर्यटन तसेच धार्मिक स्थळांवर पर्यटकांची गर्दी झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहरात परराज्यातून येणाऱ्यांची संख्या वाढली असून धार्मिक आणि पर्यटन स्थळे देखील फुल्ल झाली आहेत.

नववर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी गुजरात राज्यासह ठाणे, मुंबईतील पर्यटक नाशिककडे आकषिॅत झाले आहेत. मागील आठवड्यापासून शहरातील सर्व हॉटेल्स आणि रिसॉर्टचे बुकिंग वाढले आहे. नववर्षाचे औचित्य साधून पर्यटकांची त्र्यंबकेश्वर नगरीत मोठी गर्दी झाली आहे. देव दर्शनाबरोबरच येथील निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी भाविकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. संपूर्ण त्र्यंबक रस्त्यांवर वाहनांची गर्दी झाली आहे. त्याबरोबरच वणी येथील सप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी देखील भाविकांनी वणी गडावर गर्दी केली आहे. गडावर गेल्या दोन दिवसांपासून भाविकांची रीघ लागली आहे.

नाशिकमधील निसर्ग सौंदर्य तसेच धार्मिक तीर्थक्षेत्र असल्याने नाशिकला पसंती देणारे पर्यटक शहरातील पंचवटी, रामकुंड परिसरात आवर्जून दाखल झाले आहेत. रामकुंड येथे धार्मिक विधी तसेच पर्यटनाचा भाविकांनी आनंद घेतला. पंचवटीतील सीतागुंफा तसेच त्रिवेणी संगमावर देखील भाविकांनी भेट दिली. गोदाकाठी असलेली पुरातन मंदिरे तसेच नाशिकपासून जवळच असलेल्या त्र्यंबकनगरीत भाविकांनी देवदर्शन घेत नव्या वर्षाचा प्रारंभ केला.

गंगापूर धरणाच्या बॅक वाॅटरमध्ये सुरू झालेला बोट क्लब तसेच वाईन पार्कवर पर्यटकांची मोठी गर्दी दिसून आली. बोट क्लबचा आनंद घेण्यासाठी मुंबई आणि गुजरातहून खास पर्यटक दाखल झाले आहेत. त्यामुळे गंगापूरराेड मार्गावर वाहनांची गर्दी झाली आहे. बोट क्लबपासून दूरवर गाड्या पार्किंग कराव्या लागत आहे. गंगापूर-गिरणारे मार्गावर अनेक गाड्यांची रांग लागलेली दिसून आली.

नाशिकच्या लगतच असलेल्या इगतपुरी या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या परिसरात मुंबईतील पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. या परिसरात असलेले रिसॉर्ट मागील आठवड्यातच फुल्ल झाले आहेत.

Web Title: Tourists reach Nashik in New Year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.