पर्यटकांची ‘भरतपूरला’ मांदियाळी

By admin | Published: December 27, 2015 10:27 PM2015-12-27T22:27:18+5:302015-12-27T22:28:32+5:30

पर्यटकांची ‘भरतपूरला’ मांदियाळी

Tourists visit 'Bharatpur' | पर्यटकांची ‘भरतपूरला’ मांदियाळी

पर्यटकांची ‘भरतपूरला’ मांदियाळी

Next

नाशिक : चालू आठवड्यात गुरुवारपासून सलग चार दिवस सार्वजनिक सुट्या आल्यामुळे नागरिकांनी ‘वीकेण्ड’ मोठ्या उत्साहात साजरा केला. दरम्यान, शुक्रवारपासून नांदूरमधमेश्वर येथील राष्ट्रीय पक्षी अभयारण्यामध्ये निसर्ग पर्यटनाची आवड असणाऱ्या पर्यटकांनी राज्यभरातून हजेरी लावल्याने एकच झुंबड उडाली होती. दरम्यान, रविवारी पर्यटकांच्या गर्दीने उच्चांक गाठल्याने अभयारण्य हाऊसफुल्ल झाले होते. हिवाळ्याचा हा ‘वीकेण्ड’ म्हणजे वनविभागासाठी जणू पर्वणीच ठरली. तीन दिवसांमध्ये वनविभागाला सुमारे पन्नास हजार रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. ज्येष्ठ पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली यांनी हे तर महाराष्ट्राचे भरतपूर असे गौरवोद्गार नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्याच्या बाबतीत काढले आहे. सध्या विविध देशी-परदेशी पक्ष्यांच्या किलबिलाटाने अभयारण्य गजबजून गेले आहे. बोचऱ्या थंडीत बागायती शेतशिवारांची सफर व धुक्यामध्ये हरविलेले रस्ते आणि त्यामधून बाहेर पडणारे सूर्यकिरण असा गोदाकाठ पंचक्रोशी परिसराने राज्यभरातून आलेल्या पर्यटकांनी मने जिंकली आहेत.

या पक्ष्यांचा किलबिलाट

चित्र बलाक, रंगीत करकोचा, तलवार बदक, चक्रवाक बदक, जांभळी पाणकोंबडी, थापट्या बदक, तरंग, भुवई बदक, गढवाल, नकटा बदक, जांभळा बगळा, राखाडी बगळा, लालसरी बदक, मराल, टिबुकुली बदक, उघड्या चोचीचा करकोचा, गे्र-हेडेड फ्लायकॅचर, उघड्या चोचीचा बलाक (ओपन बिल स्टॉर्क), पांढऱ्या मानेचा करकोचा, छोटा शराटी (ग्लॉसी आयबीज), काळा शराटी (ब्लॅक आयबीज), पांढरा शराटी, चमचा बगळा (स्पूनबील), दलदल ससाणा (मार्श हॅरियर), दलदल ससाणा, टिबकेदार गरुड, ससाणा, या पक्ष्यांचे दर्शन घडत आहे.

Web Title: Tourists visit 'Bharatpur'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.