भगूरला तिरंगी लढती

By Admin | Published: November 13, 2016 10:53 PM2016-11-13T22:53:39+5:302016-11-13T23:06:25+5:30

भगूरला तिरंगी लढती

Tournament of Bhagur to Tripura | भगूरला तिरंगी लढती

भगूरला तिरंगी लढती

googlenewsNext

भगूर : नगरपालिकेच्या निवडणुकीत १९ उमेदवारांनी माघार घेतल्याने नगरसेवकपदासाठी ५२ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात ४ अपक्ष आणि तीन नगराध्यक्षपदासाठी सज्ज झाले आहेत. माघारीनंतर हे चित्र स्पष्ट होऊन अनेक दुरंगी, तिरंगी, चौरंगी लढती रंगणार आहेत. दोन ठिकाणी राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीला, तर एका ठिकाणी भाजपाला उमेदवारच मिळू शकलेला नसल्याचे दिसत आहे.
प्रभाग १ अ हा महिला अनु. जातीसाठी राखीव असून, येथे माजी नगराध्यक्ष, विद्यमान नगरसेवक स्वाती झुटे लढत आहेत. मागील पंचवार्षिक निवडणुकीत शहर विकास आघाडीकडून निवडून येऊन नंतर बंडखोरी करून शिवसेनेत जाऊन त्या नगराध्यक्ष झाल्या. या बंडखोरीबद्दल उच्च न्यायालयात त्यांच्याविरुद्ध दावा सुरू असूनही त्या उमेदवारी करत आहे, तर त्यांच्या विरुद्ध भाजपाच्या कविता जाधव या आहेत. येथे आघाडीचा उमेदवार नसल्याने दुरंगी लढत होणार आहे. प्रभाग १ ब हा सर्वसाधारण प्रभाग असून, भाजपातर्फे विद्यमान नगरसेवक शांताराम शेटे, शिवसेनेकडून शेतकरी सोसायटी संचालक भाऊसाहेब गायकवाड, तर आघाडीतर्फे मोहम्मद अन्सारी यांच्यात तिरंगी लढती होणार आहेत.
प्रभाग २ अ हा महिला अनु. जातीसाठी राखीव असून, शिवसेनेच्या अश्विनी साळवे, तर शिवसेनेचे माजी नगरसेवक सचिन गांगुर्डे यांच्या पत्नी सुवर्णा पगारे या भाजपाच्या आणि पौर्णिमा मेश्राम आघाडीतर्फे तिकिटावर लढत आहेत. येथे तिरंगी लढत होणार आहे. प्रभाग २ ब हा सर्वसाधारण असून, येथे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर हे शिवसेनेच्या वतीने तर माजी नगराध्यक्ष भारती साळवे आघाडीतर्फे आणि प्रसाद आडके भाजपाच्या तिकिटावर लढत आहेत.
प्रभाग ३ अ हा ओबीसी राखीव असून, शिवसेनेतर्फे उत्तम आहेर, तर भाजपाकडून माजी नगरसेवक सुनील जाधव आणि आघाडीच्या वतीने विशाल बलकवडे लढत आहेत. प्रभाग ३ ब हा जनरल महिलांसाठी राखीव असून, मनसेचे शहराध्यक्ष काकासाहेब देशमुख यांच्या पत्नी जयश्री देशमुख शिवसेनेतर्फे तर सुलेभा देशमुख भाजपाच्या वतीने आणि सत्यभामा मोजाड आघाडीकडून उमेदवारी करत असून, तिरंगी लढत होणार आहे. प्रभाग ४ अ ओबीसी राखीव असून, सुरेश वालझाडे हे शिवसेना व मधुकर कापसे भाजपा आणि योगेश लकारिया हे आघाडीतर्फे लढत आहे. प्रभाग ४ ब हा जनरल महिला राखीव असून, शकुंतला कुंडारिया (शिवसेना), लता इंदारखे (भाजपा) आणि सुरेखा मोहिते (आघाडी) तर प्राजक्त बागडे या अपक्ष असल्याने येथे चौरंगी लढत होणार आहे.
प्रभाग ५ अ हा अनु. जाती महिलांसाठी राखीव असून, संगीता पिंपळे (शिवसेना), प्रियंका पवार (भाजपा), तर शिल्पा जाधव (आघाडी) यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. प्रभाग ५ ब हा जनरल असून, येथे काँग्रेसचे शहरप्रमुख मोहन करंजकर (आघाडी), युनूस शेख (भाजपा)े आणि संतोष ओहोळ (शिवसेना) यांच्यात तिरंगी लढत होणार आहे.

 

Web Title: Tournament of Bhagur to Tripura

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.