‘टूर आॅफ ड्रॅगन’ सायकल स्पर्धेसाठी महाजन बंधू सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 05:05 PM2017-07-27T17:05:22+5:302017-07-27T17:05:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : भूतान आॅलिम्पिक कमिटी यांच्यातर्फे सप्टेंबर महिन्यात भूतान येथे होणाºया ‘टूर आॅफ ड्रॅगन’ या जगातील सर्वांत कठीण आणि एकदिवसीय सायकल रॅलीसाठी नाशिकचे सायकलपटू डॉ. महेंद्र महाजन, डॉ. हितेंद्र महाजन आणि किशोर काळे रवाना होणार आहेत.
सायकलचा प्रचार, प्रसार व्हावा तसेच नागरिकांमध्ये सायकलविषयी गोडी निर्माण व्हावी यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. २६८ किलोमीटरसाठी घेण्यात येणाºया या स्पर्धेला शनिवारी (दि. २) सप्टेंबरला पहाटे २ वाजता सुरुवात होणार आहे. समुद्र सपाटीपासून ८५६० फूट उंचीवर असणाºया चार उंच डोंगररांगा आणि दºया- खोºयांच्या परिसरात अत्यंत खडतर अशा मार्गावर ही स्पर्धा पार पडणार आहे. भूतान येथे होणाºया स्पर्धेच्या मार्गात सपाटीकरण नसून अधिकाधिक भाग हा डोंगरव्याप्त असल्याने या स्पर्धेत सगळ्याच सायकलपटूंचा कस लागणार आहे.
भूतान येथील जकार टाउन येथून या रॅलीला सुरुवात होणार असून, पहिल्या टप्यात किकी - ला (२८७० मी), दुसºया टप्यात योतांग - ला (३४३४ मी), तिसºया टप्यात चेंदजेबी (२४४० मी), चौथ्या टप्यात पेले - ला (३४३० मी), आणि पाचव्या टप्यात डॉक्युला (३१५० मी) या डोंगररागातून या स्पर्धेचा मार्ग जाणार आहे. ४० ते ६० किमी उंच असलेल्या डोंगरावर चढणे हे जसे आव्हानात्मक आहे तसेच ६० ते ७० किमी वेगाने हे डोंगर उतरणे तेवढेच कठीण असणार आहे. अतिशय वेगात डोंगरावरून खाली येताना अनेकदा ब्रेकदेखील निकामी होतात. डोंगर चढताना थंड वातावरणात वाढ होणे आणि खाली येताना उष्ण वातावरण आणि अधून-मधून येणारा पाऊस यामुळे ही स्पर्धा अत्यंत आव्हानात्मक आहे.