अन्नपाण्यासाठी बिबट्या नागरी वस्तीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2020 02:38 PM2020-04-06T14:38:26+5:302020-04-06T14:38:52+5:30

कळवण : पश्चिम भागात लॉक डाउनमूळे रस्ते सुनसान पडले आहेत. या शांततेचा फायदा उठवत बिबट्यांनी अन्न पाण्यासाठी आपला मोर्चा नागरी वस्त्यांकडे वळविल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे.

 Towards a bustling urban setting for food | अन्नपाण्यासाठी बिबट्या नागरी वस्तीकडे

अन्नपाण्यासाठी बिबट्या नागरी वस्तीकडे

Next

कळवण : पश्चिम भागात लॉक डाउनमूळे रस्ते सुनसान पडले आहेत. या शांततेचा फायदा उठवत बिबट्यांनी अन्न पाण्यासाठी आपला मोर्चा नागरी वस्त्यांकडे वळविल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे. वनविभागाने त्वरीत पिंजरा लावून सहकार्य करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
अभोणा परिसरातील बार्डे, दह्याणे, गोसराणे शिवारात शेतकरी बांधवांना सातत्याने बिबट्यांचे दर्शन होत आहे. कोरोनाच्या पाशर््वभूमीवर सर्वत्र लॉक डाउन असल्याने जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्वच व्यवहार शंभर टक्के बंद असल्याने सर्वत्र स्मशान शांतता पसरली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी शेती कामांकडे लक्ष केंद्रीत केले आहे. शेतांमध्ये बिबट्यांचे दर्शन घडू लागल्याने भीती पसरली आहे. गोसराणे येथील दादाजी पाटील यांचे घराजवळ बांधलेल्या शेळीचा बिबट्याने फडशा पाडल्याने पशुपालकांची चिंता वाढली आहे. विश्वास मोरे यांचे घराजवळील सीसीटीव्हीत बिबट्याचे दर्शन झाले. मात्र, त्यांचा गोठा जाळीबंद असल्याने जनावरे वाचली. वनविभागाने अभोणा शिवारात पिंजरा लावण्यात आला आहे.

Web Title:  Towards a bustling urban setting for food

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.