जॉगिंग ट्रॅकवरील १७ वाहनांचे केले टोइंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 01:08 AM2019-04-22T01:08:44+5:302019-04-22T01:09:03+5:30
साईनाथनगर चौफुलीलगत जॉगिंग ट्रॅकच्या बाहेर बेकायदेशीर दुचाकी वाहने उभी करून नागरिकांना ये-जा करण्यास होत असलेला अडथळा दूर करण्यासाठी महापालिकेच्या पूर्व विभागाच्या वतीने मोहीम राबवून शनिवारी सायंकाळी जॉगिंग ट्रॅकच्या बाहेर रस्त्यावर लावलेली सतरा दुचाकी वाहने उचलून नेण्यात आल्या.
इंदिरानगर : साईनाथनगर चौफुलीलगत जॉगिंग ट्रॅकच्या बाहेर बेकायदेशीर दुचाकी वाहने उभी करून नागरिकांना ये-जा करण्यास होत असलेला अडथळा दूर करण्यासाठी महापालिकेच्या पूर्व विभागाच्या वतीने मोहीम राबवून शनिवारी सायंकाळी जॉगिंग ट्रॅकच्या बाहेर रस्त्यावर लावलेली सतरा दुचाकी वाहने उचलून नेण्यात आल्या.
साईनाथनगर चौफुली ते वडाळागाव या जॉगिंग ट्रॅकवर साईनाथनगर, विनयनगर, उद्यान कॉलनी, इंदिरानगर यांसह परिसरातून सकाळी व सायंकाळी युवक-युवती महिला व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने फेरफटका मारण्यासाठी येतात, परंतु जॉगिंग ट्रॅकलगत असलेल्या आॅनलाइन परीक्षा केंद्रावर जिल्ह्यासह विविध गावांहून परीक्षा देण्यासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी येत असल्याने त्यांची दुचाकी व चारचाकी वाहने सर्रासपणे जॉगिंग ट्रॅकवर लावली जातात.
मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, अतिक्रमण विभागाचे उपायुक्त रोहिदास बहिरम, पूर्व विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे, सहायक अधीक्षक एस. एल. काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम राबवण्यात आली. यावेळी गुणवंत वाघ, जीवन ठाकरे, सहा विभागाचे अतिक्रमण पथक, सहा वाहने, पोलीस कर्मचारी व अतिक्रमण विभागाचे ४५ कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
कारवाईचे स्वागत
फेरफटका माणसासाठी येणाºया नागरिकांना त्रास होत असे. या संदर्भात ‘लोकमत’ने सातत्याने वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्याची दखल घेत शनिवार सायंकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान महापालिकेने जॉगिंग ट्रॅकवरील सतरा वाहने उचलून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. महापालिकेने केलेल्या या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले असून, त्यात सातत्य ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे.