आजपासून शहरात 'टोइंग'चा दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:18 AM2021-07-07T04:18:24+5:302021-07-07T04:18:24+5:30
नाशिक : शहरातील बहुचर्चित वाहनांचा टाेइंग ठेका मंजूर झाला आहे. त्याची अंमलबजावणी मंगळवारपासून (दि.६) करण्यात येणार आहे. आज ...
नाशिक : शहरातील बहुचर्चित वाहनांचा टाेइंग ठेका मंजूर झाला आहे. त्याची अंमलबजावणी मंगळवारपासून (दि.६) करण्यात येणार आहे. आज संध्याकाळी पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. त्यामुळे मागील दाेन वर्षांपूर्वी सुरु झालेल्या टाेईंगनंतर पाेलीस, वाहनधारकांत पुन्हा एकदा रस्त्यांवर वादविवाद उद्भवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
येत्या ६ जुलै २०२१पासून शहरातील विविध मार्गांवर वाहतूक शाखेने मंजूर केलेल्या टाेइंग ठेक्याला सुरुवात हाेत आहे. त्यासाठी लागणाऱ्या कार्यादेशावर पाेलीस आयुक्तांनी सही केली असून, वाहतूक शाखेने मनपाकडूनही कागदाेपत्री प्रक्रिया पूर्ण करून घेतली आहे, अशी माहिती शहर वाहतूक शाखेचे सहायक आयुक्त सीताराम गायकवाड यांनी दिली आहे.
वाहने टोइंगसाठी चार टेम्पो, तीन क्रेन असतील
शहरात वाहनांची संख्या वाढल्याने वाहनतळाचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यातच काही वाहनचालक बेशिस्तपणे वाहने ररस्त्याच्या कडेला उभी करीत असल्याने वाहतूक कोंडी हाेऊन अपघातांना निमंत्रण मिळत असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले आहे. टोइंग व्हॅन कारवाईबाबत हरकती, समस्या, सूचना असल्यास त्या नोंदवण्यासाठी नागरिकांना १५ दिवसांची मुदत देण्यात आली होती. मात्र या कालावधीत केवळ दोनच सूचना प्रशासनाला प्राप्त झाल्याने अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
------इन्फो---
असे असणार टोईंगचे दर
दुचाकी वाहने : एकूण २९० रुपये ( टोइंग दर- ९० व शासकीय शुल्क २०० रु.)
चारचाकी वाहने : एकूण ५५० रुपये ( टोइंग दर- ३५० व शासकीय शुल्क २०० रु.