टोइंग कर्मचाऱ्यांची महिलेस शिवीगाळ, वाहतुकीची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 01:28 AM2018-04-28T01:28:18+5:302018-04-28T01:28:18+5:30

दवाखान्यात अ‍ॅडमिट करण्यापूर्वी मुलाचा एक्सरे काढण्यासाठी महात्मा गांधी रोडवर आलेल्या महिलेची दुचाकी टोइंग वाहनात टाकल्यानंतर जागेवरच दंड भरण्यास तयार असतानाही टोइंग वाहनावरील कर्मचाºयांनी या महिलेस शिवीगाळ केल्याची घटना शुक्रवारी (दि़ २७) रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली़ दरम्यान, महिलेस शिवीगाळ होत असल्याच्या घटनेनंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी टोइंगचे वाहन अडवून रास्ता रोको आंदोलन केले़

 Towing employees' womb, traffic congestion | टोइंग कर्मचाऱ्यांची महिलेस शिवीगाळ, वाहतुकीची कोंडी

टोइंग कर्मचाऱ्यांची महिलेस शिवीगाळ, वाहतुकीची कोंडी

Next

नाशिक : दवाखान्यात अ‍ॅडमिट करण्यापूर्वी मुलाचा एक्सरे काढण्यासाठी महात्मा गांधी रोडवर आलेल्या महिलेची दुचाकी टोइंग वाहनात टाकल्यानंतर जागेवरच दंड भरण्यास तयार असतानाही टोइंग वाहनावरील कर्मचाºयांनी या महिलेस शिवीगाळ केल्याची घटना शुक्रवारी (दि़ २७) रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली़ दरम्यान, महिलेस शिवीगाळ होत असल्याच्या घटनेनंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी टोइंगचे वाहन अडवून रास्ता रोको आंदोलन केले़ या घटनेची माहिती मिळताच सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक घटनास्थळी पोहोचले व त्यांनी नागरिकांची समजूत घातली़ दरम्यान, टोइंगवरील कर्मचाºयांची दिवसेंदिवस दादागिरी वाढत चालल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे़  मुलाला अ‍ॅडमिट करण्यापूर्वी एक्सरे काढण्यासाठी एक महिला रात्री आठ वाजेच्या सुमारास आपल्या मुलाला दुचाकीवरून एमजी रोड परिसरातील एक्स-रे सेंटरमध्ये आली होती़ या महिलेने घाईघाईत आपली गाडी नो पार्किंगमध्ये उभी केली व एक्सरेसाठी मुलाला घेऊन गेली़ या कालावधीत टोइंगवरील कर्मचाºयांनी महिलेची गाडी उचलण्यास सुरुवात केली व योगायोगाने महिला आपल्या दुचाकीजवळ आली़ तिने नो पार्किंगमध्ये वाहन असल्याचे कबूल करून दंड जागेवर घेऊन दुचाकी देण्याची विनंती केली़ मात्र, टोइंग वाहनावरील कर्मचाºयांनी या महिलेस शिवीगाळ करीत दमदाटी सुरू केली़ यामुळे संबंधित महिला केविलवाण्या पद्धतीने हताश होऊन विनवणी करीत होती़ महात्मा गांधी रोडवरील काही नागरिकांनी हा प्रकार पाहताच ते संतप्त झाले व त्यांनी जागेवर दंड भरून महिलेस वाहन देण्याची विनंती केली असता त्यांनी नागरिकांच्या विनंतीलाही जुमानले नाही़ अखेर नागरिकांचा टोइंग कर्मचायांच्या विरोधात संताप झाला व त्यांनी टोइंगचे वाहन अडवून अघोषित रास्ता रोको आंदोलन केले़ यामुळे महात्मा गांधी रोडवर चांगलीच वाहतूक कोंडी झाली़ या घटनेची माहिती सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांना कळताच ते कर्मचायांसह घटनास्थळी पोहोेचले़ त्यांनी नागरिकांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला़ यावेळी नागरिकांनी टोइंगवरील कर्मचायांविरोधात तक्रारी केल्या़
बेशिस्त आणि उर्मट
टोइंग वाहनावरील कर्मचायांच्या दादागिरीमुळे शहरवासीय त्रस्त झाले आहेत़ पोलिसांचा परवाना मिळाल्यागत टोइंग वाहनावरील टवाळ मुले रस्त्याने ये-जा करणाया महिला व मुलींवर शेरेबाजी करत असल्याचे प्रकार नाशिककर पाहत आहेत. या वाहनावरील टारगट मुले वाहनधारकांशी खुलेआम दादागिरी करीत असल्याचे प्रकार अनेक वेळा समोर आले आहेत. यामुळे पोलिसांची प्रतिमा मलिन होत असतानाही पोलीस खात्याला मात्र काहीही एक सोयरसुतक नसल्याचे वारंवार समोर आले आहे. टोइंग वाहन हे वाहतूक शिस्तीसाठी आहे की टवाळांच्या मस्तीसाठी, असा सवाल संतप्त नागरिकांनी उपस्थित केला.

Web Title:  Towing employees' womb, traffic congestion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.