कसबे सुकेणेची बाजारपेठ सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 10:17 PM2020-08-11T22:17:14+5:302020-08-12T00:05:26+5:30
कसबे सुकेणे : गावातील पोळा वेशीजवळ कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने प्रशासनाने कसबे सुकेणे बाजारपेठेचे मुख्य प्रवेशद्वार असलेली पोळा वेस बंद केली आहे. त्यामुळे व्यापारी आणि दुकानदार संतप्त झाले असून, मेनरोड खुला करण्याची मागणी होत आहे. क
लोकमत न्यूज नेटवर्क
कसबे सुकेणे : गावातील पोळा वेशीजवळ कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने प्रशासनाने कसबे सुकेणे बाजारपेठेचे मुख्य प्रवेशद्वार असलेली पोळा वेस बंद केली आहे. त्यामुळे व्यापारी आणि दुकानदार संतप्त झाले असून, मेनरोड खुला करण्याची मागणी होत आहे.
कसबे सुकेणे येथे सोमवारी पुन्हा बाधित रुग्ण आढळल्याने प्रतिबंधित क्षेत्रात भर पडली आहे. गावातील पोळा वेशी परिसरात राहणाऱ्या व्यक्तीला बाधा झाल्याने प्रशासनाने मेनरोड बंद केला आहे. ऐन पोळा, गणेशोत्सव काळात बाजारपेठ बंद केल्याने छोटे-मोठे दुकानदार संतप्त झाले आहेत. सणासुदीचे दिवस असल्याने दुकानमालकांनी मोठ्या प्रमाणात माल भरून ठेवला आहे. प्रशासनाने दुकानदारांचा विचार न करता मेनरोडचे प्रवेशद्वार बंद केले आहे, असा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे. शहरी भागाप्रमाणे प्रतिबंधित क्षेत्राची रचना करून व्यापाºयांना दिलासा द्यावा, अशी मागणी कसबे सुकेणे व्यापारी असोसिएशनने केली आहे. अधिकारी-व्यापाºयांत वादबसस्थानक परिसरातील एका दुकानात अधिकाºयांनी ग्राहकांची खबरदारीबाबत तपासणी केली असता दुकानदार व अधिकाºयांमध्ये बाचाबाची झाल्याचे समजते. अधिकाºयांच्या चुकीच्या वक्तव्याचा व्यापारी असोसिएशने निषेध नोंदविला
आहे. पोळा, गणेशोत्सवामुळे व्यापाºयांनी माल भरला आहे; मात्र कंटेन्मेंट झोनमुळे मेनरोड बंद झाल्याने दुकानदारांचे मोठे नुकसान होणार आहे.
- प्रशांत कुलथे, कसबे सुकेणे शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातही कंन्टेन्मेंट झोनची रचना करावी. केवळ बाधिताचे घरच प्रतिबंधित करावे.
- देवीदास मोरे, दुकानदार
मेनरोड, कसबे सुकेणे