नगरसूल गावात कडकडीत बंद
By admin | Published: June 3, 2017 12:56 AM2017-06-03T00:56:26+5:302017-06-03T00:56:37+5:30
येवला : नगरसूल येथील शेतऱ्यांनी संपाच्या दुसऱ्या दिवशी गाव बंद आंदोलन केले.
येवला : नगरसूल येथील शेतऱ्यांनी संपाच्या दुसऱ्या दिवशी गाव बंद आंदोलन केले. मंडल अधिकारी कार्यालयासमोर ठिय्या दिला. गावातून फेरी काढण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांनी कर्जमाफी द्या, दुधाला तसेच शेतमालाला भाव द्या, स्वामिनाथन आयोग लागू झालाच पाहिजे आशा घोषणा देत फेरी नगरसूल मंडल अधिकारी कार्यालयासमोर नेण्यात आली. नंतर तेथे ठिय्या आंदोलन केले. संप काळात नगरसूल गाव बंद असणार आहे. आठवडे बाजारही बंद ठेवण्यात येणार आहेत. शेतकरी संपला गावकरी व शेतकरी चांगला प्रतिसाद देत आहेत. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन केले जात असून, शेतकऱ्यांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करावे, असे अवाहन सरपंच प्रसाद पाटील यांनी केले. उत्तम गाडेकर, कोतकर यांनी भाषणातून शासनाचा निषेध केला. यावेळी मंगेश जाधव, नवनाथ बागुल, सतीश पैठणकर, सुनील पैठणकर,विकास निकम, अनिल निकम, अरु ण धनवटे, संभाजी बोरसे, बंडू भगत यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.