कर्षण मशीन कामगारांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 12:16 AM2019-02-25T00:16:57+5:302019-02-25T00:17:15+5:30
कर्षण मशीन कारखाना येथे कामगारांच्या विविध मागण्यांसाठी नॅशनल रेल्वे मजदूर संघाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.
नाशिकरोड : कर्षण मशीन कारखाना येथे कामगारांच्या विविध मागण्यांसाठी नॅशनल रेल्वे मजदूर संघाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.
कर्षण मशीन कारखान्यात टेक्निशियन कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात यावी, कामगारांना अपमानीत करू नये, त्यांच्याकडे संशयाने पाहू नये आदि मागण्यांसाठी नॅशनल मजदूर युनियन संघाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी द्वारसभेत संघटनेचे अध्यक्ष अनिल दराडे, सचिव भारत पाटील, खजिनदार नाना धोंगडे, उपाध्यक्ष पुंजाराम जाधव आदींनी मार्गदर्शन केले.
सहाय्यक मनुष्यबळ अधिकारी,कल्याण निरीक्षक हे पद स्थायी करावे, अनुकंपा आधारावर वारसांना सेवेत घ्यावे, कामगार संख्या कमी असून सुद्धा अधिकाºयांकडून कामगारांवर आणण्यात येणारा दबाव बंद करावा अशा अन्य मागण्याही करण्यात आल्या आहेत़