कृषी कायद्याच्या विरोधात २९ रोजी ‘ट्रॅक्टर रॅली’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:22 AM2021-08-17T04:22:02+5:302021-08-17T04:22:02+5:30

सोमवारी (दि. १६) सकाळी नाशिकरोडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार आवारात ही बैठक घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी अशोक ...

'Tractor Rally' on 29th against Agriculture Act | कृषी कायद्याच्या विरोधात २९ रोजी ‘ट्रॅक्टर रॅली’

कृषी कायद्याच्या विरोधात २९ रोजी ‘ट्रॅक्टर रॅली’

Next

सोमवारी (दि. १६) सकाळी नाशिकरोडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार आवारात ही बैठक घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी अशोक खालकर होते. यावेळी केंद्र सरकारचे कायदे शेतकरी विरोधी असून, शेतकऱ्यांना शेतमजूर बनवणारे व भूमिहीन बनवणारे आहे. तसेच उद्योगपतींच्या घशात शेती देणारे आहेत. वीज बिल कायदा प्रस्तावित शेतकरी विरोधी व वीज सर्वसामान्य शेतकऱ्यांना सवलती हिसकावून घेणारा आहे. अलिकडे पेट्रोल, डिझेल दरवाढ करण्यात आल्याने सर्वसामान्य माणूस मेटाकुटीस आल्याची भावना वक्त्यांनी व्यक्त केली. दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नाशिक जिल्ह्यात ट्रॅक्टर रॅली काढण्याचा निर्णय घेण्यात आला. २९ ऑगस्ट रोजी नाशिक शहरातील गोल्फ क्लब येथून ही रॅली काढण्याचे ठरविण्यात आले. तसेच रॅली यशस्वी करण्यासाठी उपस्थितांनी आर्थिक मदतही जाहीर केली. या रॅलीच्या जनजागृतीसाठी गावोगावी पोस्टर्स, बॅनर लावण्याचे ठरविण्यात आले.

बैठकीस खासदार हेमंत गोडसे, आमदार दिलीप बनकर, सरोज आहेर. माजी मंत्री बबन घोलप, योगेश घोलप, शिवसेनेचे विजय करंजकर, सुनील बागुल, सुधाकर बडगुजर, काँगेसचे शरद आहेर, किसान सभेचे राजू देसले, उत्तम खंडभाले, ॲड. प्रभाकर खरोटे, किसन गुजर, ॲड. तानाजी जायभावे, शशिकांत उनव्हणे, नगरसेवक संतोष साळवे, प्रशांत दिवे, राजेंद्र डोखळे, भास्कर शिंदे, नितीन मते, ॲड. प्रभाकर वायचळे, अशोक सातभाई, सोमनाथ बोराडे, नामदेव बोराडे, अर्चना गोडसे, दत्ता गायकवाड, बाळासाहेब कासार, जगदीश पवार, विष्णुपंत गायखे, भाऊसाहेब शिंदे, शिवराय रसाळ, कृष्णा भगत, ॲड. नितीन ठाकरे, जयश्री खर्जुल, सुदाम बोराडे, शिवाजी म्हस्के, वसंत कावळे, नाना सरवते, बाळासाहेब म्हस्के, भास्कर गोडसे आदी उपस्थित होते.

(फोटो १६ शेतकरी)

Web Title: 'Tractor Rally' on 29th against Agriculture Act

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.