ट्रॅक्टर भाडेवाढीमुळे मशागतीचे गणित कोलमडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:15 AM2021-05-07T04:15:01+5:302021-05-07T04:15:01+5:30
सर्वसामान्य नागरिकांबरोबरच आता इंधन दरवाढीचा फटका शेतकऱ्यांनाही बसत आहे. शेतीसाठी ट्रॅक्टरचा अधिक वापर होत असून, ट्रॅक्टरमुळे वेळेची व श्रमाची ...
सर्वसामान्य नागरिकांबरोबरच आता इंधन दरवाढीचा फटका शेतकऱ्यांनाही बसत आहे. शेतीसाठी ट्रॅक्टरचा अधिक वापर होत असून, ट्रॅक्टरमुळे वेळेची व श्रमाची बचत होत असली तरी त्याला लागणाऱ्या डिझेल व ऑईलचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे मशागतीच्या दरातही कमालीची वाढ होत आहे. सध्या ७०० रुपये प्रतितास ट्रॅक्टर भाडे घेतले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ट्रॅक्टरची मशागत डोईजड होऊ लागली आहे. पूर्वी अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या दारात बैलजोडी हमखास असे. पण यांत्रिकीकरणामुळे त्याच दारात आता ट्रॅक्टर दिसत आहेत. मशागतीपासून ते पेरणीपर्यंतची कामे काही तासांत होत असल्याने शेतकरी ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेती करीत आहेत. एकीकडे परिश्रम व वेळेची बचत होत असली तरी इंधन दरवाढीमुळे शेतीवर होणारा खर्च दिवसेंदिवस वाढतच आहे. बरेच शेतकरी भाडेतत्त्वावर शेतीची मशागत करतात. त्यामुळे त्यांना जादा पैसे मोजावे लागत आहेत. एकरी दोन ते अडीच हजार नुसता नांगरणीचा खर्च होत आहे. तर शेणखताच्या ट्रॉलीचा दर चार ते पाच हजारांवर गेला आहे. त्यामुळे उत्पन्न कमी आणि खर्च अधिक अशी अवस्था बळीराजाची झाली आहे. लॉकडाऊनमध्ये कांदा दर पडल्याने अनेकांचा कांदा दारातच पडून आहे. त्यामुळे मशागतीच्या खर्चाचा मेळ बसविणे अवघड झाले आहे.
कोट....
दरवर्षी खते, बि-बियाणांच्या किमती वाढत आहेत. तर मोठ्या कष्टाने आणलेल्या पिकाला योग्य भाव मिळत नाही. आता डिझेल वाढीमुळे ट्रॅक्टरचे भाडेही वाढले आहे. त्यामुळे शेतीत उत्पन्न कमी आणि खर्च अधिक होत आहे.
- रंगनाथ शिंदे, शेतकरी, चांदोरी.
कोट...
दिवसेंदिवस डिझेलचे दर वाढत आहेत. यामुळे कमी दरात मशागत परवडत नाही. त्यामुळे नाईलाजाने ट्रॅक्टरद्वारे केल्या जाणाचा मशागतीचे दर वाढवावे लागत आहेत.
- सुजित भोज, ट्रॅक्टर व्यावसायिक ,चांदोरी.
इन्फो
७०० रुपये
ट्रॅक्टरभाडे प्रतितास
---------------------
२५०० रुपये
नांगरणीचा एकरी खर्च
---------------------
५००० रुपये
शेणखताच्या ट्रॉलीचा दर
---------------------------------------------------
फोटो - ०६ ट्रॅक्टर
===Photopath===
060521\06nsk_7_06052021_13.jpg
===Caption===
फोटो - ०६ ट्रॅक्टर