ट्रॅक्टर, औजारे, कार्ड वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 06:35 PM2020-01-10T18:35:11+5:302020-01-10T18:35:48+5:30
युवकांनी कुटुंब व गावातील, परिसरातील ग्रामस्थांना महाराजस्व अभियानाची माहिती देऊन शासनाच्या योजनेसह प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी समाजात प्रबोधन घडवून आणणे गरजेचे आहे. प्रशासकीय अधिकारी हे अभियान सक्षम व प्रभावीरीत्या राबवीत असल्याने जनतेला याचा मोठ्या प्रमाणावर लाभ होत आहे. त्यामुळे महाराजस्व अभियान यशस्वीपणे राबवून जनतेला त्याचा लाभ मिळवून द्यावा, असे आवाहन आमदार नितीन पवार यांनी केले.
कळवण : युवकांनी कुटुंब व गावातील, परिसरातील ग्रामस्थांना महाराजस्व अभियानाची माहिती देऊन शासनाच्या योजनेसह
प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी समाजात प्रबोधन घडवून आणणे गरजेचे आहे.
प्रशासकीय अधिकारी हे अभियान सक्षम व प्रभावीरीत्या राबवीत असल्याने जनतेला याचा मोठ्या प्रमाणावर लाभ होत आहे. त्यामुळे महाराजस्व अभियान यशस्वीपणे राबवून जनतेला
त्याचा लाभ मिळवून द्यावा, असे आवाहन आमदार नितीन पवार यांनी केले.
दळवट येथे समाधान शिबिराचे आयोजन तहसीलदार, गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने महसूल विभागाकडून करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी आमदार नितीन पवार, तर प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सभापती सौ. मीनाक्षी चौरे, उपसभापती विजय शिरसाठ, माजी सभापती मधुकर जाधव, राजेंद्र भामरे, तहसीलदार बी.ए. कापसे, विजय पाटील, गटविकास अधिकारी डी.एम. बहिरम, महावितरणचे आंबेडकर, आदिवासी विकासचे महाले आदि उपस्थित होते.
महसूल विभाग प्रशासनाचा कणा म्हणून ओळखला जातो. या विभागाशी संबंधित शेतकरी, सामान्य जनतेचे प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रशासन गतिमान, लोकाभिमुख, पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यासाठी महाराजस्व अभियान हा महत्त्वाकांक्षी कार्यक्र म कळवण तालुक्यात राबविण्यात येत आहे. सुरगाणा तालुक्यात त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे आवाहन आमदार नितीन पवार यांनी यावेळी केले.
यावेळी तहसीलदार बी.ए. कापसे यांनी महाराजस्व अभियान अंतर्गत समाधान शिबिराची
माहिती देऊन महसूल विभागाशी निगडित प्रश्न सोडविण्यासाठी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन केले. तालुका कृषी अधिकारी
विजय पाटील यांनी केंद्र व राज्य शासनाच्या कृषी योजनांची माहिती देऊन लाभ घेण्याचे आवाहन
केले. गटविकास अधिकारी डी.एम.बहिरम यांनी पंचायत समिती अंतर्गत योजना व घरकुल योजनांची माहिती दिली.
तहसीलदार बी.ए. कापसे, तालुका कृषी अधिकारी विजय पाटील, गटविकास अधिकारी डी. एम. बहिरम आदींच्या हस्ते शिबिराच्या माध्यमातून करण्यात आले. शिबीरास दळवट परिसरातील नागरिक, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डिजिटल स्वाक्षरीत दाखले
या शिबिरात महसूल विभागाकडून डिजिटल स्वाक्षरीत दाखले, रेशनकार्ड, वय, अधिवास व उत्पन्न दाखले वितरण, राष्ट्रीयत्व आदी दाखले देण्यात आले. संजय गांधी निराधर योजना, आधार नोंदणी, आरोग्यविषयक माहिती व कार्ड तर पंचायत समितीकडून शबरी घरकुलांचे कार्यारंभ आदेश व कृषी विभागाच्या योजनेंतर्गत लाभार्थींना ट्रॅक्टर, औजारे वाटप, आमदार नितीन पवार यांच्या हस्ते करण्यात आले.