नाशकातील दुकाने १० ते ५  सुरू ठेवण्याचा व्यापारी संघटनांचा ठराव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 07:14 PM2020-06-26T19:14:45+5:302020-06-26T19:21:51+5:30

नाशिकशहरातील दुकाने सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय शहरातील व्यापारी संघटनांनी घेतला आहे. कोरोना महामारीचा प्रभाव लक्षात घेऊन कोरोनाची व्यापारी संघटनांनी हा निर्णय घेतला आहे.

Trade unions decide to keep 10 to 5 shops in Nashik | नाशकातील दुकाने १० ते ५  सुरू ठेवण्याचा व्यापारी संघटनांचा ठराव 

नाशकातील दुकाने १० ते ५  सुरू ठेवण्याचा व्यापारी संघटनांचा ठराव 

Next
ठळक मुद्देदुकाने सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत सुरू राहाणार पालकमंत्र्यांसोबत बैठकीनंतर व्यापारी संघटनांचा ठराव

नाशिक : नाशिकमधील कोरोना महामारीचा प्रभाव लक्षात घेऊन कोरोनाची साखळी तुटण्यासाठी काही दिवस शहरातील दुकाने सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय शहरातील व्यापारी संघटनांनी घेतला आहे. महापालिकेने बंधनकारक केलेली सम-विषम तारखेला दुकाने सुरू ठेवण्याची पद्धत बंद करावी व दुकानाची वेळ सकाळी १० ते ५ अशी करण्यात यावी अशी मागणी व्यापारी संघटनांनी पालकमंत्री छगन भूजबळ यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (दि.26)झालेल्या बैठकीत केली. 
महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमधील व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक शासकीय विश्रामगृहात पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी सुरज मांढरे, पोलीस आयुक्त  विश्वास नांगरे पाटील, मनपाचे अतिरिक्त आयुक्त अष्टेकर, उपस्थित होते. दोन दिवसापूर्वी महाराष्ट्र चेंबरच्या कार्यालयात विविध व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली होती. या बैठकीचा तपशील पालकमंत्र्यांना देण्यात आला. त्यांनंत छगन भूजबळ यांनी आर्थिक चक्र सुरु व्हावे यासाठी केंद्र व राज्य सरकारने लॉक डाउन उठवून सकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या व्यवहारास मुभा दिली असल्याने नमूद केले.े त्यामुळे पुन्हा लॉक डाउन करणे किंवा सम विषम तारखेचा निर्णय बदलणे तूर्त शक्य नसले तरी लवकरात लवकर त्यावर विचार करून निर्णय घेऊ असे अाश्वासन दिले.  तसेच जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा याकडे लक्ष व्यापाऱ्यांनी लक्ष देण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी केल्या. दुकानाच्या वेळेबाबत व्यापाऱ्यांनी सर्वांनी निर्णय घेऊन ठरवावे असे आवाहन त्यानी केले. त्यानंतर विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यानी सम-विषम दिवसाचे बंधन काढून दुकानाची वेळ १० ते ५ करण्याचा ठराव मंजूर केला. यावेळी प्रफुल्ल संचेती, महेंद्र पटेल, शरद मिश्रा,  मदन पारेख,  नंदू पारेख, विजय कुलकर्णी,  संतोषकुमार लोढा, कैलास चावला,  राजेंद्र फड,  राजेश मालपुरे, मनोज कोतकर, वेदप्रकाश सहगल,  गिरीश नवसे,  शांताराम घंटे,  राजन दलवानी, रामनाथ मुंदडा, सतीश अग्रवाल,  विजय खडके,  एकनाथ अमृतकर, जुझार ढोर्जीवाला,  मंगेश वझट आदिसह विविध व्यापारी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. 

Web Title: Trade unions decide to keep 10 to 5 shops in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.